मुंबई जिल्हा युवा महिला बॉक्सिंग संघाने नागपूर येथे सांघिक चॅम्पियनशिप जिंकली आहे. या स्पर्धेत वीर सावरकर बॉक्सिंग क्लबचे योगदान मोठे होते. वीर सावरकर बॉक्सिंग क्लबची जागृती दोघीने ८१+ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. रिया सुतारने ८१ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. तर स्मृती ढवळे हिने ७० किलोमध्ये कांस्यपदक पटकावले.
अंजली यादव आणि एकविरा यादव यांनी उत्कृष्ट चढाई केली, परंतु उपांत्यपूर्व फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला. सुवर्णपदक विजेती जागृती दोघीची पुढील महिन्यात भोपाळ येथे होणाऱ्या युथ वुमन नॅशनलसाठी निवड झाली आहे.
Join Our WhatsApp Community