Central Railway : लोकल रुळावरून घसरल्याने कल्याण-कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत

अंबरनाथ येथे लोकल रुळावरून घसरल्याने कल्याण - कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

356
Central Railway : लोकल रुळावरून घसरल्याने कल्याण-कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत

रविवार १८ जून रोजी लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक आहे. अशातच सेंट्रल लाईवरील (Central Railway) लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. माहितीनुसार, अंबरनाथ येथे लोकल रुळावरून घसरल्याने कल्याण – कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

(हेही वाचा – मरीन ड्राईव्ह येथील एका हॉटेलच्या इमारतीला आग; व्हिडीओ व्हायरल)

सेंट्रल रेल्वे प्रशासनाने (Central Railway) दिलेल्या माहितीनुसार, रविवार सकाळी अंबरनाथ येथे डाऊन दिशेकडे जाणाऱ्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. परिणामी कल्याण-कर्जत दिशेकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तर, डाऊन कल्याण ते बदलापूर विभागात ब्लॉक घेण्यात आला असून अप दिशेकडील कर्जत-कल्याण विभाग सुरू आहे. दरम्यान, लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळी ८.२५ वाजता अंबरनाथ (Central Railway) येथे रिकाम्या लोकलच्या एका डब्याचे एक चाक साइडिंगमध्ये रुळावरून घसरले. तात्काळ संबंधित रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लोकलचे चाक रुळावर आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घटनेमुळे डाऊन एलटीटी विशाखापट्टनमला अंबरनाथ येथे थांबवून ठेवले आहे. तसेच एक डाऊन बदलापूर आणि अंबरनाथ लोकलला उल्हासनगर येथे थांबविले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.