छत्तीसगडमध्ये ख्रिस्ती मिशनरी एका मोडस ऑपरेंडीने धर्मांतर करत आहेत. नोकरीसाठी पुरुष घराबाहेर पडल्यावर या मिशनरी दुपारच्या वेळेत हिंदूंच्या वस्त्यांमध्ये फिरतात. घराघरात एकट्या असलेल्या महिलांना त्यांच्या सर्व व्यावहारिक समस्या सुटतील, अशी बतावणी करतात आणि त्यांना धर्मांतराच्या जाळ्यात अडकवतात, अशी ख्रिस्ती धर्मांतराची पद्धत छत्तीसगड येथील हिंदू जनजागरण मंचचे प्रांत संयोजक ज्योती शर्मा यांनी मांडली.
गोवा येथे श्री रामनाथ देवस्थान येथे आयोजित वैश्विक हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे चौथे पुष्प गुंफण्यात आले. सोमवार, १९ जून या चौथ्या दिवसाच्या प्रारंभी ‘धर्मांतर, घरवापसी आणि कठुआ सत्य’ या विषयावरील पहिल्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ज्योती शर्मा धर्मांतर या विषयावर बोलत होत्या.
(हेही वाचा – आदिपुरुष : थिल्लर संवाद, रामायणाचे विडंबन, प्रेक्षकांच्या टीकेनंतर निर्मात्यांना जाग)
आम्ही ‘धर्मांतर मुक्त छत्तीसगड’, अशी घोषणा केली आहे. ख्रिस्ती मिशनऱ्या या ठिकाणी फिरत असताना घराघरातील महिलांना टार्गेट करतात, त्यांचे मतपरिवर्तन करतात. सुरुवातीचे ४ महिने त्यांना पैसे देतात, अन्नधान्य देतात, त्यासोबत दर रविवारी त्यांना प्रार्थनेसाठी बोलावत असतात, जेव्हा त्यांची धर्मांतर करण्याची मानसिकता होते, तेव्हापासून या मिशनरी या धर्मांतरित हिंदू महिलांना आता त्यांना पैसे न देता उलट त्यांनाच स्वतःच्या घरातून मिळकतीचा काही भाग आणून देण्यासाठी दबाव टाकतात, ज्यांना पैसे देणे शक्य होत नाही त्यांना घरातून अन्नधान्य आणून देण्यासाठी सांगितले जाते. एका बाजूला हिंदू धर्म सोडला आहे आणि दुसरीकडे ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे, अशा अवस्थेत असलेल्या या धर्मांतरित हिंदू महिला नाईलाजाने घरातून पैसे आणून देऊ लागतात, धर्मांतराची ही मोडस ऑपरेंडी सरसकट वापरली जाते. धर्मांतराच्या कचाट्यात सापडलेल्या महिलांची आम्ही घरवापसी करतो. आजवर ४ हजार महिलांची आम्ही घरवापसी केली आहे. हे धर्मांतर रोखण्यासाठी आम्ही ‘टोको, रोको आणि शेवटी ठोको’, अशी नीती वापरतो, असे ज्योती शर्मा म्हणाल्या.
नक्षलवादी भागात राजरोसपणे धर्मांतर केले जात आहे. छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोग यांनी प्रथम नक्षलग्रस्त भागात धर्मांतर मोहीम चालवण्यासाठी मोकळीक दिली होती, त्यावेळी या नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले आहे. आज हिंदू तिकडे नक्षल भागात जाऊ शकत नाही, पण पाद्री बिनधास्त जाऊ शकतो, अशी स्थिती आहे, असेही ज्योती शर्मा म्हणाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community