शिवसेनेचा १९ रोजी २०२३ रोजी ५७वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपारिक वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सोमवारी संध्याकाळी होणार असून मुख्यमंत्री एकनाथ यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन गोरेगाव येतील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शिंदे आणि ठाकरे गटाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना का फुटली? याचं कारण देत मोठा दावा केला आहे.
(हेही वाचा – उद्धवजी तुम्ही मालवणीत तरी जाऊन दाखवा; आशिष शेलार यांचा पलटवार)
नक्की काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
प्रसार माध्यमांसोबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘मी तुम्हाला १०० टक्के सांगतो, माननीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे यांनी एक प्लॅन केला होता. जो प्लॅन सर्व आमदारांना माहित झाला होता. शिवसेनेचे आमदार कमी करायचे, राष्ट्रवादीचे १०० करायचे. १००चा नारा राष्ट्रवादीने दिला आणि आमदार कुठले कमी करायचे, तर उद्धव ठाकरेंचे कमी करायचे, रायगडमधले कमी करायचे. जिथे जिथे राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत, तिथे तिथे शिवसेनेचे आमदार कमी करून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आणि उपमुख्यमंत्री पद आदित्य ठाकरेला द्यायचे. हा त्यांचा अंतर्गत प्लॅन होता. हा प्लॅन लीक झाला. आणि मग जेव्हा आमदारांना वाटलं आमचं भविष्य धोक्यात आहे, म्हणून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात सर्व आमदार बाहेर आले. हे कितीतरी वेळा शिवसेनेच्या आमदारांनी बोलून दाखवलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याकरता जो प्लॅन केला होता. आणि त्या प्लॅनमुळे हे सरकार गेले. म्हणून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात एक नवीन सरकार आलं.’
हेही पहा –
Yeo
Join Our WhatsApp Community