ओम राऊत दिग्दर्शित प्रभास, किर्ती सेनन आणि देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका असलेला, रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचा सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे. हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन अनेक ठिकाणी तोडफोडही करण्यात आली. अशातच मुंबईतील पालघरच्या एका चित्रपटगृहात हिंदू संघटनेचे संतप्त कार्यकर्ते घूसले आणि त्यांनी ‘आदिपुरुष‘चित्रपटाचा सुरु शो बंद पाडला. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘बॉयकॉट’ या हॅशटॅगसह सोशल मिडीयावरही या चित्रपटाला विरोध दर्शविण्यात येत आहे.
(हेही वाचा – आदिपुरुष : थिल्लर संवाद, रामायणाचे विडंबन, प्रेक्षकांच्या टीकेनंतर निर्मात्यांना जाग)
चित्रपटगृहात नेमके काय घडले? (Adipurush)
पालघरच्या नालासोपारा येथील एका चित्रपटगृहात रविवारी १८ जून रोजी ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाचा शो सुरु असताना हिंदू संघटनांच्या सदस्यांनी तो बंद पाडला. आंदोलकांनी चित्रपटाचे प्रदर्शनही थांबवले.
Protest of Hindu organization continues against film Adipurush. Hindu organizations created ruckus during the show at Capital Mall in Nalasopara area of Palghar district. Activists entered the show while walking. The show was stopped and slogans were raised fiercely. pic.twitter.com/masAnY2ViK
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) June 19, 2023
“तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवणार का, आम्ही आमच्या देवाचा अपमान सहन करू शकत नाही. आम्ही इथेच आमचं म्हणणं मांडणार. आमच्या देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांचा आम्ही विरोध करणार. आम्हाला फासावर चढावं लागलं तर तेही करू पण अपमान सहन करणार नाही,” असं म्हणत या लोकांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी बॉलिवूडविरोधी घोषणाही दिल्या. (Adipurush)
आदिपुरुषच्या निर्मात्याला आली जाग, वादग्रस्त संवाद काढणार
चित्रपटामधल्या वादग्रस्त संवादांच्या वाढत्या विरोधावर चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी ट्वीट करून महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चित्रपटाबाबत स्पष्टीकरण देताना चित्रपटातील वादग्रस्त संवाद या आठड्यात बदलले जातील असेही त्यांनी सांगितले.
लेखक-दिग्दर्शक ट्रोल
चित्रपटाच्या संवादांमुळे चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक यांना ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. चित्रपटात रामायण चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.