मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका तरुणाच्या गळ्यात पट्टा अडकवून त्याला कुत्र्यासारखे भूंकण्यास भाग पाडले आहे. पीडित तरुण माफी मागताना आणि मियाँ बनण्याबाबत बोलताना दिसत आहे. व्हिडीओवरुन असे लक्षात येत आहे की, धर्मांतरण केलेले आरोपी पीडित तरुणावर दबाव टाकत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आरोपींवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Christian Conversion: छत्तीसगडमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्या धर्मांतरासाठी करतात महिलांना टार्गेट – ज्योती शर्मा)
हे प्रकरण भोपाळ टिला जमालपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. बिलाल टीला, फैजान लाला, मोहम्मद समीर टीला, साहिल बच्चा आणि मुफिद खान अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पीडित तरुणाच्या गळ्यात पट्टा अडकवून त्याला गुडघ्यावर बसण्यास सांगून त्याला कुत्र्यासारखे भूंकण्यास सांगितले.
Faizan, Bilal, Sameer, Mufid, and Sahil brutally thrashed a Hindu boy, Vijay, put a belt around his neck, and forced him to bark like a dog in Bhopal, MP.
Dara Hua Visesh Samuday threatened to rape his sister and abuse his mother too.@MPPoliceDeptt @CP_Bhopal… pic.twitter.com/O3anFZAjv0
— BALA (@erbmjha) June 19, 2023
या प्रकरणाची दखल घेत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा मीडियाशी बोलताना म्हणाले, “मी तो व्हिडिओ पाहिला आहे. कोणाशीही असे अमानूष गैरवर्तन करणे निंदनीय आहे. मी भोपाळच्या पोलीस आयुक्तांना या प्रकणाची चौकशी करण्यास सांगून काय सत्य आहे ते पडताळून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास करत असतानाच पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community