Beautification of parks : उद्यानांचे सुशोभिकरण आता आकर्षक दिव्यांद्वारे

179
उद्यानांचे सुशोभिकरण आता आकर्षक दिव्यांद्वारे
उद्यानांचे सुशोभिकरण आता आकर्षक दिव्यांद्वारे

दक्षिण मुंबईतील बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र उद्यान, वामनराव महाडिक उद्यान आणि नलावडे उद्यानाचे सुशोभिकरण आता अनोख्या पध्दतीने केले जाणार असून याअंतर्गत उद्यानांच्या परिसरांत बहुरंगी विद्युत दिवे बसवून हे आकर्षक सुशोभिकरण केले जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. ही कामे प्रगतीपथावर असून पदपथ, दुभाजक व वाहतूक बेटाचे सुशोभिकरण तसेच विद्युत रोषणाईने सुशोभिकरण केली जात आहे. त्यानुसार शहरातील बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र उद्यान, वामनराव महाडिक उद्यान व नलावडे उद्यान येथे बहुरंगी विद्युत दिव्यांद्वारे आकर्षक सुशोभिकरण हे विद्युत रोषणाई करत केली जाणार आहे. तिन्ही उद्यानांमध्ये ३०० विद्युत दिवे बसवले जाणार आहेत. यासाठी सुमारे ६८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

(हेही वाचा – अमित शहांना मुंबईत येऊन उद्धव ठाकरे नावाचा जप करावा लागतो, यातच आपली ताकद!)

बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र संघर्ष मैदानामध्ये असलेल्या १ किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या (१ हजार १५० मीटर) व १.२ मीटर रुंदीच्या सायकल ट्रॅक बनवण्यात आला. तसेच या मैदानातील मातीच्या ‘जॉगिंग ट्रॅक’चे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर या मैदानामध्ये मोफत सायकल स्टँडदेखील सुरु करण्यात आले असून याठिकाणी १४ सायकली ठेवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या मनोरंजन मैदानात सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सायकल स्टँड यासह खुली व्यायाम शाळा, योगा सरावस्थळ यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या मनोरंजन मैदानामध्ये बटुवृक्षासह (बोन्साय) सुगंधी झाडे लावण्यात आली आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.