शिवसेनेचा ५७व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गोरेगाव येथे नेस्को सेंटरमध्ये मेळावा झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. ‘आधीचे मुख्यमंत्री पेनच ठेवत नव्हते. माझ्याकडे दोन दोन पेन आहेत. मी रस्त्यावरही लोकांच्या कामासाठी सह्या केल्या. तुम्ही सरकार चालवायचं सोडून गाडी चालवत होता. अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या सह्या केल्या नाहीत, त्या मी एक दिवसात केल्या. रिक्षावाल्याने ठाकरेंच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातलं, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
(हेही वाचा – Shivsena Foundation Day : वडील म्हणून श्रीकांतला हॉस्पिटल उघडून देऊ शकलो नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
‘उद्धव ठाकरेंना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास नव्हता. म्हणून ते कुणाला मोठं होऊ देत नाहीत. कुणी चांगलं भाषण करायला लागलं की, त्याचं भाषण कट करायचे. कार्यकर्त्यांना मोठं करा, हे मी त्यांना सांगायचो. पण उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्यांना मोठं होऊन द्यायचं नव्हतं. कारण त्यांना दरबारी राजकारण हवं होतं. पण आता एवढे सगळे लोक जात आहेत, थोडंतरी आत्मपरीक्षण करा. या सगळ्यांच लोकांनी खोके घेतले आहेत का?’ असा सवाल यावेळी शिंदेंनी ठाकरेंना केला.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कालच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना किती शिव्या दिल्या. अब्दाली, हिटलर, अफजल खान म्हटलं. अरे ते कुठं, तुम्ही कुठं. सर्व राज्याने पाहिलं आहे, जेव्हा एक नोटीस आली, तेव्हा XXX पातळ झाली होती. नंतर मोदींना भेटण्यासाठी गेला. शिष्टमंडळ बाहेर ठेवलं आणि शिष्टाई आतमध्ये गेली. आम्हाला सर्व माहिती आहे.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community