गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील गीताप्रेसला १०० वर्ष पूर्ण झाली. गीताप्रेसच्या योगदानाविषयी केंद्र सरकारने गीताप्रेसला ‘गांधी शांती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. याविषयी वैश्विक हिंदु राष्ट्र सन्मेलनात गीताप्रेसच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला. या पुरस्काराला काँग्रेसने सावरकर द्वेषापोटी विरोध केला, त्याचा निषेधही करण्यात आला.
काँग्रेस पक्षाने गीताप्रेसला हा पुरस्कार देण्याला विरोध केला आहे. विरोध करतांना काँग्रेसने म्हटले की, ‘गीताप्रेसला शांती पुरस्कार देणे म्हणजे सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कार देण्यासारखे आहे’, याविषयी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात काँग्रेस पक्षाच्या निषेधाचा प्रस्ताव पारित करण्यात आला.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारूदत्त पिंगळे यांनी या दोन्ही प्रस्तावांचे वाचन केले. याविषयी सद्गुरु (डॉ.) चारूदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘यातून काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करण्याचाही प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्ष गांधी यांच्यावर स्वत:ची मत्तेदारी असल्याचा प्रयत्न करत आहे. भारत स्वतंत्र्य झाल्यावर गांधी यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला; मात्र काँग्रेसने गांधी यांच्या या सल्ल्याची अवहेलना केली. काँग्रेसकडून भारतात हिंदूंविरोधी वक्तव्य केले जाते, तर भारताबाहेर भारताविरोधी वक्तव्य केले जाते. अशा काँग्रेसचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव निषेध करते.’’
Join Our WhatsApp Community