सध्या केरळमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक झाली आहे. त्यामुळे केरळ लवकरच दुसरे काश्मीर होण्याची वेळ आली आहे. केरळात कम्युनिस्ट, मुसलमान, ख्रिस्ती यांच्याबरोबर आता हिंदूंसोबतच हिंदूंना संघर्ष करावा लागत आहे, अशा शब्दांत केरळचे राकेश नेल्लिथया यांनी व्यथा मांडली.
गोवा येथे श्री रामनाथ देवस्थान येथे आयोजित वैश्विक हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे चौथे पुष्प गुंफण्यात आले. सोमवार, १९ जून या चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात ‘केरळात हिंदूंची दुःस्थिती’ या विषयावर बोलत होते.
केरळात राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा कमी झाल्या आहेत. कारण सरकारने या शाखा मैदानात न घेण्याचा आदेश काढला होता, त्यामुळे त्या शाखा मंदिरात घेणे सुरु झाले, परंतु मंदिरातही शाखा नाही, असाही आदेश सरकारने काढला आणि आता मंदिरातही या शाखा भरणार नाहीत. त्यामुळे मंदिरातूनही संघाच्या शाखा बंद होणार आहेत, असे नेल्लिथया म्हणाले.
(हेही वाचा – Veer Savarkar: सावरकरद्वेषापोटी काँग्रेसचा गीता प्रेसला घोषित पुरस्काराला विरोध; हिंदू अधिवेशनात काँग्रेसचा निषेध)
पीएफआयवर बंदी घालण्यात आली आहे. पण आता ड्रग्ज जिहाद सुरु केला आहे. अत्यंत स्वस्त दरात शाळकरी मुलांना ड्रग्ज दिले जात आहे. या ड्रग्जने मुले १० तास नशेत राहत आहेत. केरळमध्ये नुकतेच १ लाख कोटी किंमतीचा ड्रग्ज साठा पकडला. इतक्या ड्रग्जने केरळ उद्धवस्त केले जाऊ शकते. असेही नेल्लिथया म्हणाले.
केरळमध्ये १९६५ चा पब्लिक वर्कशीप ऍक्ट आणला होता. ज्यामध्ये कुणाच्या घरात मृत्यू झाला तर त्या कुटुंबातील सदस्यांना १४ दिवस मंदिरात येणे निषिद्ध होते, सुतक होते. परंतु आता हा कायदा रद्द केला. त्यामुळे आता मंदिर हे वर्कशीप ठिकाण न राहता सार्वजनिक ठिकाण बनले आहे. त्यामुळे हा निर्णय देशभरातही धोकादायक आहे. आमच्या मंदिरातील प्रथा परंपरा आता न्यायालयातील ४-५ न्यायमूर्ती योग्य – अयोग्य ठरवत आहेत, असेही नेल्लिथया म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community