सचिन धानजी, मुंबई
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डयांची डागडुजी (Pothole Repair) करण्यासाठी सुमारे ६० ते १०० कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. परंतु आजवर खड्डयांच्या डागडुजीवर करण्यात येणारा खर्च यंदा मात्र दहा पटीने वाढवला गेला आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वीची खराब रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी व खड्डे भरण्यासाठी सहा एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून यासाठी तब्बल ६५० कोटी रुपये खर्च केले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना खऱ्या अर्थाने खड्डे मुक्त रस्ते मिळतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विविध रस्त्यांचे पावसाळा पूर्वीची सुरक्षात्मक देखभाल व तातडीची कामे करण्यासाठी १२३ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. शिवाय विविध रस्त्यांचे काँक्रिट वापरुन खड्डे बुजवण्यासाठी (Pothole Repair) आणखी २०० कोटी रुपये व पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यादरम्यान आणि पावसाळ्यानंतर सुरक्षात्मक देखभाल व तातडीची कामे व खड्डे रॅपिड हार्डनिंग वापरुन भरण्यासाठी ७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या तिन एजन्सीबरोबरच मागील नोव्हेंबर महिन्यांमध्ये एमएमआरडीएकडून ताब्यात आलेल्या पूर्व द्रुतगती महामार्ग व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पावसाळ्यापूर्वीची डागडुजी करण्यासाठी ९३ कोटी व १३१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय पी डिमेलो रोडपासून ते घाटकोपर मानखुर्द लिंक रोडपर्यंत पूर्व मुक्त मार्गाचे प्रतिबंधात्मक देखभाल कामे करण्यासाठी सुमारे ३६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
(हेही वाचा – मुलुंड : बोगस डॉक्टरांनी दिले ४२ जणांना मृत्यूचे दाखले; पोलिसांकडून तिघांना अटक)
मुंबई शिवसेना भाजप युतीचे शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यावर कोणतेही खड्डे शिल्लक राहू नये आणि त्यामुळे करदात्या जनतेला त्रास होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाला जास्तीत जास्त काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार खड्डे भरण्यासाठी (Pothole Repair) नवनवीन तंत्राचा वापर करण्याचा प्रयोग करत त्यातील यशस्वी तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत रॅपिड हार्डनिंग सह इतर तंत्राच्या आधारे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. शिवाय त्याला जोड काँक्रीट ची असून त्याद्वारे खड्डे भरण्यासाठी एक वेगळी एजन्सी नेमली आहे.
यंदा प्रथमच पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात आल्याने अनुक्रमे १८ किमी आणि २७ किमी लांबीच्या या रस्त्यांवर विविध ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे सुरू असल्याने त्यावर यंदा खड्डे पडू नये (Pothole Repair) म्हणून तब्बल सव्वा दोन कोटींचा खर्च केला जात आहे. मात्र ही सर्व कामे रस्ते विभागाच्या माध्यमातून मध्यवर्ती खात्याद्वारे केली जाणार असल्याने विभाग कार्यालयाचा कोणताही संबंध नाही. आजवर रस्त्यावरील खड्डे हे विभाग कार्यालय मार्फत बुजवले (Pothole Repair) जात होते. परंतु मागील तीन ते चार वर्षांपासून विभागावरील ही जबाबदारी काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे खड्डे समस्या निकालात निघायला विलंब होत आहे. परंतु यंदा सहा ते सात एजन्सी नेमताना विभाग कार्यलयावर कोणतीही जबाबदारी टाकण्यात आली नाही. विभाग कार्यालयाच्या सहकार्याशिवाय खड्डे बुजवणे शक्य नसल्याने अखेर अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांच्या स्वाक्षरीने प्रत्येक विभागातील रस्त्यावर उद्भवणाऱ्या खड्ड्याच्या समस्येवर विभागाचे सहायक आयुक्त यांनी लक्ष ठेवावे आणि खड्डे भरल्यानंतर त्यांना अवगत करावे अशा सूचना अतिरिक्त आयुक्त यांनी रस्ते विभागाला दिल्या असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदा सहा ते सात एजन्सी नेमून व साडेसहाशे कोटी रुपये केवळ खड्ड्यांवर खर्च केले जात असताना मुंबईकरांना खऱ्या अर्थाने खड्डे मुक्त (Pothole Repair) रस्ते मिळतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अशाप्रकारे खड्डे दुरुस्तीवर होणार खर्च
विविध रस्त्यांचे पावसाळा पूर्वी सुरक्षात्मक देखभाल व तातडीची कामे (४५ दिवस)
सात परिमंडळ : एकूण खर्च सुमारे १२३ कोटी रुपये
विविध रस्त्यांचे काँकिट वापरुन खड्डे बुजवणे (सहा महिने)
२४ विभाग कार्यालय : सुमारे २०० कोटी रुपये
पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यादरम्यान आणि पावसाळ्यानंतर सुरक्षात्मक देखभाल व तातडीची कामे व खड्डे रॅपिड हार्डनिंग वापरुन भरणे (सहा महिने)
सात परिमंडळ : सुमारे ७० कोटी रुपये
पूर्व द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजी
एकूण खर्च : ९३ कोटी रुपये
पश्चिम द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजी
एकूण खर्च : सुमारे १३१ कोटी रुपये
पी डिमेलो रोडपासून ते घाटकोपर मानखुर्द लिंक रोडपर्यंत पूर्व मुक्त मार्गाचे प्रतिबंधात्मक देखभाल कामे
एकूण खर्च : सुमारे ३६ कोटी रुपये
हेही पहा –
Join Our WhatsApp Community