जगन्नाथ पुरीची ऐतिहासिक रथयात्रा आजपासून म्हणजेच मंगळावर २० जूनपासून सुरु होत आहे. भारतातील कोट्यवधी भाविकांसाठी ही यात्रा श्रद्धेचे स्थान आहे. ओडिशामधील पुरी येथील जगन्नाथ मंदिरातून ऐतिहासिक रथयात्रा निघते. यामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. यावेळी भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांचे रथ हाताने ओढले जातात.
ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्याची परंपरा प्रदीर्घ काळापासून चालत आली आहे. या रथयात्रेतून भगवान जगन्नाथ शहराला भेट देतात, मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा त्यांच्यासोबत ते रथात उपस्थित असतात. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला ही यात्रा सुरू होते. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा भव्य आणि विशाल रथात बसून गुंडीचा मंदिरात जातात. हे मंदिर त्यांच्या मावशीचे घरही मानले जाते. ओडिशाच्या या भव्य रथयात्रेत केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातूनही भाविक पुरीत जमतात.
(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर, जाणून घ्या कसा असेल हा दौरा?)
नाशिकमध्ये प्रथमच जगन्नाथ रथोत्सव
नाशिक (Nashik) शहरात देखील जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रथोत्सवाचे हे पहिलेच वर्ष आहे. आज (२० जून) पंचवटी परिसरातुन जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ झाला असून या यात्रेसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रथयात्रा संपेपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले आहे.
Rath Yatra greetings to everyone. As we celebrate this sacred occasion, may the divine journey of Lord Jagannath fill our lives with health, happiness and spiritual enrichment. pic.twitter.com/ATvXmW3Yr0
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2023
… म्हणून रथयात्रा काढली जाते
पद्म पुराणानुसार भगवान जगन्नाथाच्या बहिणीने एकदा हे शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा जगन्नाथ आणि बलभद्र यांनी त्यांची प्रिय बहीण सुभद्रा यांना नगर दाखवण्यासाठी रथात बसवले. यादरम्यान ते गुंडीचा येथे मावशीच्या घरीही गेले आणि येथे सात दिवस राहिले. तेव्हापासून जगन्नाथ यात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे. नारद पुराण आणि ब्रह्म पुराणातही याचा उल्लेख आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community