सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये सगळे लोक आपापल्या कामात एवढे मग्न असतात की, कोणालाही एकमेकांची साधी विचारपूस करायला वेळ नसतो. पण तरीसुद्धा आपल्याकडून कोणाला कशी मदत होईल तशी करावी, या विचारांचीही माणसे भरपूर पाहायला मिळतात. असे लोक आपापल्या परीने इतरांना शक्य तितकी मदत करतात. त्यातही सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा सोप्या झालेल्या आहेत.
सध्या प्रियांशी चंदेल नावाच्या बाईचं सोशल मीडियावरून खूप कौतुक होत आहे. प्रियांशीने तिच्याकडे आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयला चांगली नोकरी मिळवून दिली म्हणून संपूर्ण सोशल मीडियावरून लोक प्रियांशीचं भरभरून कौतुक करत आहेत. चला तर जाणून घेऊयात की, यामागची नक्की स्टोरी काय आहे ते..
(हेही वाचा – ‘तारक मेहता का उलटा चष्मा’चे निर्माते असित मोदीसह तिघांवर गुन्हा दाखल)
एके दिवशी एक डिलिव्हरी बॉय प्रियांशीच्या घरी फूड डिलिव्हरी घेऊन आला तेव्हा त्याला खूप धाप लागली होती. प्रियांशीने त्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, गेल्या एक आठवड्यापासून तो जेवत नाहीय. फक्त चहा आणि पाण्यावर राहतोय. त्याची पंचवीस हजारांची नोकरी सुटली होती. त्यात त्याच्याकडे बाईकही नाहीय म्हणून डिलिव्हरी करण्यासाठी तो तीन किलोमीटर चालत आल्याने त्याला धाप लागली होती. कोविड काळामध्ये त्याची नोकरी सुटली.
त्यावेळी तो जम्मू येथे आपल्या घरी निघून गेला. परत आल्यावर त्याने डिलिव्हरी बॉयचं काम सुरू केलं. त्यातून त्याला जास्त पैसे मिळत नाहीत असं कळलं. आणखी तो म्हणाला की, तुम्हाला वाटेल की मी काहीतरी फ्रॉड करतोय पण तसं अजिबात नाहीय. त्याचकडे घराचं भड भरायलाही पुरेसे पैसे नव्हते. तो तरुण सुशिक्षित आहे हे प्रियांशीच्या लक्षात आलं. त्याचं हे बोलणं ऐकल्यावर प्रियांशीने माणुसकी म्हणून त्याच्यासाठी जे केलं ते पाहून लोक तिचं खूप कौतुक करत आहेत.
प्रियांशीने या माणसाची मदत करायची असं ठरवलं. तिने त्या डिलिव्हरी बॉयचा बायोडेटा आणि नोकरीसाठी महत्त्वाचे असलेले कागदपत्र linkedin वर पोस्ट केले. त्यामुळे अनेक कंपन्या त्या डिलिव्हरी बॉयला नोकरी द्यायला पुढे आल्या. त्या डिलिव्हरी बॉयचं नाव साहिल असं आहे. आता त्याला नोकरी मिळाली आहे. प्रियांशीच्या या कामामुळे तिचं खूप कौतुक होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community