मुंबईतील ३२ हजार ४०७ फेरीवालेच पात्र : मुंबई महानगरपालिका संकेतस्‍थळावर यादी प्रदर्शित

320
मुंबईतील ३२ हजार ४०७ फेरीवालेच पात्र : मुंबई महानगरपालिका संकेतस्‍थळावर यादी प्रदर्शित
मुंबईतील ३२ हजार ४०७ फेरीवालेच पात्र : मुंबई महानगरपालिका संकेतस्‍थळावर यादी प्रदर्शित

शासनाच्‍या निर्देशानुसार, पथ विक्रेता असल्‍याची सिद्धता पूर्ण करणा-या ३२ हजार ४०७ मतदारांची विभागवार यादी तयार करण्‍यात आली आहे. ही यादी महानगरपालिकेच्‍या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्‍थळावर प्रदर्शित करण्‍यात आली आहे. या यादीबाबत काही हरकती / सूचना असल्‍यास विभाग कार्यालयांमध्‍ये संबंधित विभागीय वरिष्‍ठ निरिक्षक, (अतिक्रमण निर्मूलन) यांच्‍याकडे दिनांक १४ जुलै २०२३ पर्यंत लेखी स्‍वरूपात सादर कराव्‍यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई महानगरातील पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण करणे, नोंदणीकृत पथ विक्रेत्यांची मतदार यादी प्रसिद्ध करणे आणि नगर पथ विक्रेता समितीमधील पथ विक्रेता प्रतिनिधी सदस्‍यांची निवडणूक घेण्‍याबाबत राज्‍य शासनाने महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका अनुज्ञापन अधीक्षक विभागाकडून ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पथ विक्रेत्‍यांचे सर्वेक्षण करण्‍यात आले असता निकषानुसार, पथ विक्रेता सिद्धता पूर्ण करणाऱ्या एकूण ३२,४०७ पथविक्रेत्यांची प्राथमिक मतदार यादी तयार करण्यात आली आहे.

(हेही वाचा – मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पंतप्रधान मोदी, शहा, राजनाथ सिंग, नड्डा यांचे दौरे)

३ मे २०२३ रोजी नगर पथ विक्रेता समितीच्‍या झालेल्‍या बैठकीत पथ विक्रेता सिद्धता पूर्ण करणाऱ्या पथ विक्रेत्‍यांची यादी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळावर प्रदर्शित करण्‍यासाठी मंजुरी देण्‍यात आली आहे. त्‍यानुसार, ३२,४०७ पथविक्रेत्यांची विभागवार मतदार यादी तयार करण्‍यात आली आहे. त्‍यावर १४ जुलै २०२३ सायंकाळी पाच वाजेपर्यंत लेखी स्‍वरूपात हरकती / सूचना सादर करता येणार आहे. नागरिकांनी विभागीय कार्यालयांमध्‍ये संबंधित विभागीय वरिष्‍ठ निरिक्षक (अतिक्रमण निर्मूलन) यांचेकडे दिनांक १४ जुलै २०२३ पर्यंत हरकती / सूचना लेखी स्‍वरूपात सादर कराव्‍यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

ही यादी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्‍थळावर दिनांक १५ जून २०२३ रोजी प्रदर्शित करण्‍यात आली आहे. १४ जुलैपर्यंत ही यादी संकेतस्‍थळावर उपलब्‍ध रहाणार आहे. ही यादी https://portal.mcgm.gov.in ►Popular ►Find Out More ►Town Vending Committee ►Electoral List for TVC येथे किंवा https://portal.mcgm.gov.in येथे दिलेल्‍या “ Electoral List Of Street Vendors Formation Of Town Vending Committee” या सरकत्‍या पटटीवर (Scrolling Link) जाऊन पाहता येईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.