आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशात आज म्हणजेच बुधवार २१ जून रोजी नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. गेल्या आठ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेसोबत योगा साधना करून हा दिवस साजरा करत आहेत.
मात्र यावर्षी ते अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी सकाळी एक व्हिडिओ संदेश जारी करून लोकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
(हेही वाचा – International Yoga Day 2023: नियमित योगाभ्यासाने होणारे ‘हे’ आहेत दहा फायदे)
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान म्हणाले, ‘प्रत्येक वर्षी योग दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांमध्ये कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात उपस्थित असतो. तुमच्यासोबत योग करण्याचा आनंद अविस्मरणीय आहे. पण विविध जबाबदाऱ्यांमुळे मी सध्या अमेरिकेत आहे. म्हणूनच मी व्हिडिओ संदेशाद्वारे तुम्हा सर्वांशी जोडत आहे. मी सध्या तुमच्यामध्ये योगा करू शकत नाही, पण मी योगा करण्याच्या कार्यक्रमापासून दूर नाही. म्हणूनच आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता, संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एक मोठा कार्यक्रम होत आहे. मी त्यात सामील होईल. भारताच्या आवाहनावर १८० हून अधिक देशांचे एकत्र येणे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत योगाचा प्रस्ताव आला तेव्हा देशांनी त्याला विक्रमी पाठिंबा दिला होता हे लक्षात येईल. तेव्हापासून योग ही जागतिक चळवळ बनली आहे. जागतिक आत्मा बनला आहे.
Sharing my message on International Day of Yoga. https://t.co/4tGLQ7Jolo
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2023
‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’
वर्षीच्या योग दिवसाची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ म्हणजेच ‘एक विश्व-एक कुटुंब’ या कल्पनेसह सर्वांच्या कल्याणासाठी योग ही आहे. तुम्ही तुमच्या जीवनात योगाचा स्वीकार करा, दिनचर्येत योगाचा समावेश करा. अजूनही तुम्ही योगसाधनेशी जोडले गेला नसाल, तर २१ जून ही या संकल्पासाठी उत्तम संधी आहे. तुम्ही जेव्हा योगा करणे सुरु कराल, तेव्हा तुमच्या जीवनात किती मोठे परिवर्तन येईल ते तुम्ही बघालच, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘मन की बात’च्या १०२ व्या भागातून त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी अमेरिकेत करणार योगसाधना
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी ते न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात आयोजित योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. हा कार्यक्रम यूएन मुख्यालयाच्या नॉर्थ लॉनमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता होईल. यावेळी १७७ देशांचे प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘वसुधैव कुटुम्बकमसाठी योग’ अशी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community