गोव्यातील कळंगुट पंचायतीने पोर्तुगालाचा फुटबॉलपटू रोनाल्डो यांचा पुतळा उभारण्यास परवानगी दिली, मात्र हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पंचायतीच्या डोळ्यात का खुपसतो? असा संतप्त प्रश्न हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रामनाथी, फोंडा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला हिंदवी स्वराज्य संघटना-राजापूरचे महेश मयेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे नितीन काकडे, स्वराज्य गोमंतक संघटनेचे प्रशांत वाळके, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक गोविंद चोडणकर आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे यांची उपस्थिती होती.
कळंगुट पंचायतीने पंचायतीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा १० दिवसांत हटवण्याचा आदेश दिल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमींनी पंचायतीच्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर रामनाथी येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या परिसरात हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
(हेही वाचा – Hindu : दंगलीतील पीडित हिंदूंसाठी काय करावे; आमदार कपिल मिश्रा यांनी सांगितला मार्ग)
पत्रकार परिषदे जयेश थळी म्हणाले, ‘‘छत्रपति शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी तेथील शिवप्रेमी गेले वर्षभर प्रयत्न करत होते; मात्र या प्रक्रियेसाठी अनेक अडथळे आणण्यात आले. आज कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला त्याला कळंगुट पंचायतीचे आडमुठे धोरण उत्तरदायी आहे.’’ ‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री. गोविंद चोडणकर म्हणाले, ‘‘गोव्यात यापुढे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध गोमंतकातील हिंदू सहन करणार नाही. कळंगुट पंचायत पंचायत क्षेत्रातील अनधिकृत क्रॉस, अन्य अनधिकृत बांधकामे यांवर तत्परतेने कारवाई का करत नाही?’’ ‘स्वराज्य गोमंतक संघटने’चे प्रशांत वाळके म्हणाले, ‘‘कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा अजूनही पूर्णपणे हिंदुस्तानी झालेले नाही आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डोळ्यात खुपतो. असा व्यक्ती कळंगुटच्या सरपंचपदी कसा राहू शकतो, असा माझा प्रश्न आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community