पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज म्हणजेच बुधवार २१ जून रोजी अमेरिकेतील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञांच्या गटाची अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे भेट घेतली. कृषी, विपणन, अभियांत्रिकी, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील शिक्षणतज्ञांनी यावेळी मोदींचे स्वागत केले. त्यांनी भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत संशोधन सहयोग आणि द्विपक्षीय शैक्षणिक देवाणघेवाण वाढवण्याच्या शक्यतांवर यावेळी चर्चा झाली. शिक्षणतज्ञांनी पंतप्रधानांसोबत आपापल्या प्राविण्य क्षेत्रातील दृष्टीकोन आणि अनुभव सामायिक केले.
(हेही वाचा – ED Raid : ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड; १० पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी)
या संवादात सहभागी झालेल्या शिक्षणतज्ञांमध्ये चंद्रिका टंडन, अध्यक्ष – एनवाययू टंडन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग मंडळ, डॉ. नीली बेंदापुडी, अध्यक्ष – पेनसिल्व्हेनिया राज्य विद्यापीठ, डॉ. प्रदीप खोसला, कुलगुरु, कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो, डॉ. सतीश त्रिपाठी, अध्यक्ष- बफेलो विद्यापीठ, प्रोफेसर जगमोहन राजू, मार्केटिंगचे प्राध्यापक – व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेस, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, डॉ. माधव व्ही. राजन, डीन – बूथ स्कूल ऑफ बिझनेस, शिकागो विद्यापीठ, प्राध्यापक रतन लाल, मृदा विज्ञानाचे विद्यापीठस्तरीय प्रतिष्ठित प्राध्यापक; संचालक-सीएफएइएस रतन लाल सेंटर फॉर कार्बन मॅनेजमेंट अँड सिक्वेस्ट्रेशन, ओहायो राज्य विद्यापीठ, डॉ. अनुराग मैरल, कार्डिओव्हस्कुलर मेडिसिनचे सहायक प्राध्यापक तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठातील नावीन्यपूर्णता आणि जागतिक आरोग्य केंद्रात तंत्रज्ञान,नावीन्यपूर्णता आणि प्रभाव यासाठी नेतृत्व यांचा समावेश होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community