Asia cup Final 2023 : भारताने कोरले आशिया कपवर आपले नाव; बांगलादेश विरुद्ध मोठा विजय

भारतीय महिला संघाकडून श्रेयंका पाटीलने सर्वाधिक ४ विकेट्स घेत सामन्यावर वर्चस्व गाजवले.

272
Asia cup Final 2023 : भारताने कोरले आशिया कपवर आपले नाव; बांगलादेश विरुद्ध मोठा विजय

पुन्हा एकदा भारतीय महिला संघाच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय अ महिला संघाने आशिया कप २०२३वर आपलं नाव नोंदलं आहे. हाँगकाँगमध्ये खेळल्या गेलेल्या इमर्जिंग महिला आशिया कप २०२३ भारतीय अ महिला संघाने जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारतीय अ महिला संघाने बांगलादेशचा ३१ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम खेळतांना २० षटकांत ७ गडी गमावून १२७ धावा केल्या. त्याविरुद्ध बांगलादेशचा संपूर्ण संघ ९६ धावांत बाद झाला. भारतीय महिला संघाकडून श्रेयंका पाटीलने सर्वाधिक ४ विकेट्स घेत सामन्यावर वर्चस्व गाजवले.

असा रंगला अंतिम सामना…

फायनलमध्ये टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कॅप्टन श्वेता सेहरावत २० चेंडूत १३ धावा करुन नाहिदा अख्तरच्या चेंडूवर बोल्ड झाली. त्यानंतर छेत्री आणि दिनेश वृंदा चांगल्या इनिंग खेळल्या. छेत्रीने २२ चेंडूत ३६ धावा केल्या. मिडल ऑर्डरमध्ये कनिका आहुजाने २३ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. त्यामुळे भारताच्या १२७ धावा झाल्या.

९६ धावांवर बांगलादेशचा संघ परतला

१२८ धावांचा पाठलाग करतांना बांगलादेश अ महिला संघाने सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. ५१ रनांवर निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या सामन्यात बांगलादेश अ महिला संघ १९.२ ओव्हर्समध्ये ९६ धावांवर बाद झाला.

श्रेयंका पाटीलची दमदार कामगिरी

भारताची फिरकी गोलंदाज श्रेयंका पाटीलने अंतिम सामन्यात दमदार कामगिरी केली. श्रेयंका पाटीलने चार षटकांत केवळ १३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच मन्नत कश्यपने ३ तर कनिका आहुजाने २ विकेट्स घेतल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.