Hacking Data : ही मोबाईल कंपनी चोरतेय तुमचा डेटा; सावध रहा, सतर्क रहा…

252
ही मोबाईल कंपनी चोरतेय तुमचा डेटा; सावधान रहा, सतर्क रहा...
ही मोबाईल कंपनी चोरतेय तुमचा डेटा; सावधान रहा, सतर्क रहा...

हल्ली स्मार्टफोन तर सगळेच वापरतात. पण या स्मार्टफोनमुळे तुमची प्रायव्हसी (privacy) धोक्यात येऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का? होय एआयएस (AIS) म्हणजेच ऍडव्हान्स इंटेलिजेट सर्व्हिसेस (Advance Intelligent Services) साठी मोबाईल कंपनी तुमचे लोकेशन्स (Locations) , तुमचे मेसेजेस (messages), कॉल्स (calls), फोटो गॅलरी (Photo gallery) असा कितीतरी संवेदनशील डेटा कॅपचर करते.

केंद्रीय राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट वर रिप्लाय करून आदेश दिला की, रियलमी कंपनी एआय (AI) च्या नावाखाली खरोखरच ग्राहकांचा सगळा प्रायव्हेट डेटा (Private data) कॅपचर करत आहे का?, या गोष्टीची तपासणी करण्यात यावी. पण रियलमी (Realme) ने आतापर्यंत या आरोपावर कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही.

(हेही वाचा – आता प्रत्येक ट्रक चालकाचा प्रवास होणार गारेगार; नितीन गडकरी यांची घोषणा)

रियलमी हा एक चायनीज स्मार्टफोन ब्रॅण्ड (Chinese smartphone brand) आहे आणि त्यावर आता ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांचा सेन्सेटिव्ह डेटा (Sensitive data) चोरी करण्याचा आरोप लावला गेला आहे. ऋषी बाग्री नावाच्या इसमाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याने असे म्हटले आहे की, रियलमीच्या फोनमध्ये अशी एक डिफॉल्ट सेटिंग (Default setting) नेहमी ऑन असते जी त्या कंपनीच्या ग्राहकांना स्मार्टफोन वापरण्याचा चांगला अनुभव देण्याच्या नावाखाली ग्राहकांच्या फोनमधील सगळा सेन्सेटिव्ह डेटा चोरी करायला मदत करते. हे इथपर्यंत वाढले आहे की, हल्ली रियलमी मोबाईल युजर्सचा मायक्रोफोनही एक्सेस केला जातोय अस लक्षात यायला लागलंय.

याविषयीचं हे ट्विट नक्की वाचा:

या व्हिडिओवर रिप्लाय करताना राजीव चंद्रशेखर यांनी रियलमीवर या आरोप केलेल्या गोष्टींची पडताळणी व्हावी असा आदेश दिला. या आरोपावर रियलमीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.

हा चोरी झालेला डेटा कोणत्या सर्व्हरमध्ये स्टोअर केला जातो यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण भारतातील रियलमी ग्राहकांचा सगळा डेटा चिनी सरकारपर्यंत पोहोचू शकतो याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.