Balasor railway accident : बालासोर रेल्वे अपघात, वंदे भारतवर दगडफेक, या घटना म्हणजे रेल जिहाद – कर्नल आर. एस. एन. सिंह

जशी वंदे भारत ट्रेन सुरु झाली तसे त्यावर वारंवार दगडफेक होऊ लागली.

190
Balasor railway accident : बालासोर रेल्वे अपघात, वंदे भारतवर दगडफेक, या घटना म्हणजे रेल जिहाद - कर्नल आर. एस. एन. सिंह

बालासोर येथे मोठी रेल्वे दुर्घटना घडली. ज्यात ३०० जण ठार झाले. वास्तवात ही दुर्घटना होती की घातपात होता? मी पहिल्या दिवसापासून हा घातपात आहे असे सांगत आलो आहे. कारण मी सुरक्षा विषयक विश्लेषक आहे. हा जिहाद होता. या वर्षात ३१ मार्च रोजी २४ वर्षांचा युवक दिल्लीतून निघतो, जनसंपर्क एक्स्प्रेस पकडतो, केरळात उतरतो, तेथून पेट्रोल विकत घेवून अल्लापुरम एक्स्प्रेसमध्ये चढतो आणि जेव्हा रेल्वे पुलावर येते तेव्हा तो सहप्रवाशांवर पेट्रोल ओतून आग लावतो. त्यात ९ जण जखमी होतात. त्या गाडीतून पती – पत्नी आणि मुलगा घाबरून चालत्या गाडीतून उडी मरतात आणि त्यांचे प्राण जातात. पेट्रोल फेकनाऱ्याचे नाव शाहरुख सैफ आहे. हा शाहीन बाग येथे राहणारा आहे. हा झाकीर नाईकचा अनुयायी आहे. याच २ महिन्यांत तीच ट्रेन असते पण त्यावेळी आग लावणारा सिदगीर असतो. तो कन्नूर स्थानकात जातो आणि बोगीला आग लावतो. ती बोगी भारत पेट्रोलियमच्या टाक्यांजवळ होती. या सिदगीरवर कुणाचा प्रभाव होता? एक माणूस शाहीन बाग येथून केरळात येतो केवळ हिंदूंना जाळण्यासाठी येतो. याला म्हणतात गजवा ए हिंद, हाच रेल जिहाद आहे.

(हेही वाचा – Varkari : वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; मुख्यमंत्र्यांची घोषणा)

शाहीन बागचा तमाशा होतो, तेंव्हा पीएफआय केरळमधून दिल्लीत आली होती. पैसा दिला. हा आहे गजवा ए हिंद. सिदगिर याने कन्नूर का निवडले? कारण तिथे जिहादची इको सिस्टम आहे. कन्नुर, कोझिकोड, मल्लापुर, कोईमतपूर ही जिहादी ठिकाणी आहेत. सदगिर हा पश्चिम बंगालमध्ये राहणार आहे. २ वर्षांपासून तो भिकारी होता, भीक मिळत नाही म्हणून त्याने बोगी जाळली. पण हा बंगालमधून का गेला? पूर्ण बिहार, बंगाल, आसाम हा दुसरा जिहादी इको सिस्टमचा हिस्सा आहे. अहमदाबादमध्ये ४ दहशतवादी पकडले, ते बंगालमध्ये राहणारे होते. बंगालमधून माणूस अहमदाबादला जातो. ही विचार करायला लावणारी बाब आहे.

जशी वंदे भारत ट्रेन सुरु झाली तसे त्यावर वारंवार दगडफेक होऊ लागली. विशाखापट्टणम, बंगाल, बंगळुरू, तेलंगणा, विजयनगर, तिरुअनंतपुरम अशा सगळ्या ठिकाणी ट्रेनवर दगडफेक झाली. वंदे भारत विषयी इतका तिरस्कार का, वंदे मातरम् चा ज्यांना द्वेष आहे त्यांना वंदे भारतचा द्वेष असणारच. मग बालासौर अपघाताकडे दुर्लक्ष कसे शकता? या अपघात प्रकरणी सिग्नल अभियंता अमीर खान याची सीबीआय चौकशी सुरू करणार तोच तो गायब झाला. हे सगळे जिहादी एकमेकांशी जोडलेले आहेत आणि सगळ्यांचे नेतृत्व जमियत ए उलेमा करते. बालासौर हे संवेदनशील आहे. तिथे रोहिंग्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.