अमेरिकेतील आघाडीच्या आरोग्य तज्ज्ञांच्या गटाने पंतप्रधान मोदींची घेतली भेट

207
अमेरिकेतील आघाडीच्या आरोग्य तज्ज्ञांच्या गटाने पंतप्रधान मोदींची घेतली भेट
अमेरिकेतील आघाडीच्या आरोग्य तज्ज्ञांच्या गटाने पंतप्रधान मोदींची घेतली भेट

आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या अमेरिकन तज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी न्यूयॉर्क इथे भेट घेतली. दर्जेदार आरोग्य सेवेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, एकात्मिक औषधांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि आरोग्यसेवा सज्जता यासह आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध बाबींवर पंतप्रधान आणि तज्ज्ञांनी चर्चा केली.

या बैठकीत सहभागी झालेल्या तज्ज्ञांमध्ये डॉ. पीटर होटेझ, नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन, टेक्सासचे संस्थापक अधिष्ठाता, डॉ. सुनील ए. डेव्हिड, टेक्सास स्थित व्हायरो वॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. स्टीफन क्लास्को, जनरल कॅटॅलिस्टचे सल्लागार डॉ. लॉटन आर. बर्न्स, आरोग्य व्यवस्थापन प्राध्यापक, व्हार्टन स्कूल, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, डॉ. विवियन एस. ली, संस्थापक अध्यक्ष, वेरिली लाइफ सायन्सेस, नोबेल पारितोषिक विजेते डॉ. पीटर एग्रे, चिकित्सक, आणि मोलेक्यूलर जीवशास्त्रज्ञ, जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिन यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – आता प्रत्येक ट्रक चालकाचा प्रवास होणार गारेगार; नितीन गडकरी यांची घोषणा)

खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि वैज्ञानिक संवादक नील दे ग्रासे टायसन यांचीही घेतली मोदींनी भेट

सुविख्यात अमेरिकन खगोल वैज्ञानिक, लेखक आणि वैज्ञानिक संवादक नील दे ग्रासे टायसन यांनी बुधवारी न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

युवकांमध्ये वैज्ञानिक वृत्ती आणि विचार रुजवण्याबद्दल पंतप्रधान आणि नील टायसन यांच्यात विचारांची देवाणघेवाण झाली. अंतराळ क्षेत्रात भारताची वेगाने होणारी प्रगती तसेच, भारताने हाती घेतलेली विविध अवकाश अभियाने यांच्याविषयीही त्यांनी सविस्तर चर्चा केली.

भारताने नुकत्याच आणलेल्या राष्ट्रीय अवकाश धोरणाअंतर्गत, खासगी क्षेत्र आणि अभ्यासक यांच्यातील समन्वयाच्या संधी या विषयावरही दोघांमधे चर्चा झाली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.