BMC : धोकादायक दरडींच्या ठिकाणी २५० प्रशिक्षित नागरीक सज्ज

290
MLA BMC Budget Fund : विधानसभा क्षेत्रात महापालिकेच्या निधीतून खर्च : आमदारांनी सुचवलेल्या सर्व कामांसाठी एकच कंत्राटदार
MLA BMC Budget Fund : विधानसभा क्षेत्रात महापालिकेच्या निधीतून खर्च : आमदारांनी सुचवलेल्या सर्व कामांसाठी एकच कंत्राटदार

भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाने बृहन्मुंबईतील संभाव्य दरडी कोसळण्याच्या २४९ ठिकाणांचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाआधारे २४९ पैकी ७४ ठिकाणे अतिधोकादायक घोषित केली आहेत. या ७४ ठिकाणांच्या निकटच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत संभाव्य धोका उद्भवल्यास काय करावे, काय करू नये; याचे प्रशिक्षण टप्पेनिहाय पद्धतीने देण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत २५० नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले.

पावसाळा सुरू झाला की मुंबईतील काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असतो. संभाव्य धोका गृहीत धरून मुंबई महानगरातील पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पश्चिम येथील बांदिवली टेकडी, यादव नगर, जोगेश्वरी (पश्चिम), पूर्व उपनगरातील कुर्ला कसाईवाडा, वाशी नाका चेंबुर येथील भारत नगर, घाटकोपर येथील वर्षानगर आदी परिसरातील नागरिकांकरिता या कार्यशाळांद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, प्रभारी सह आयुक्त (सामान्य प्रशासन) सुनील धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे मुंबईतील तुकड्यांचे प्रमुख उपसमादेशक सारंग कुर्वे यांनी प्रशिक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे.

नागरिकांच्या रोजच्या कामात व्यत्यय नको म्हणून महानगरपालिकेने सुटीच्या दिवशी म्हणजे १७ आणि १८ जून २०२३ रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले. यापुढेही अशा प्रशिक्षण कार्यशाळा सुरू राहणार आहेत. विभागस्तरीय सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. १७ आणि १८ जून २०२३ रोजी आयोजित विविध ठिकाणच्या ६ प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये २५० पेक्षा जास्त‍ स्थानिकांनी सहभाग नोंदविला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या प्रशिक्षकांमार्फत या नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले.

(हेही वाचा – सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या २६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटींची मदत मिळणार)

भविष्यात आपत्ती उद्भवल्यास ‘काय करावे, काय करू नये’ याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपस्थितांकडून काही महत्त्वाची प्रात्यक्षिके देखील करुन घेण्यात आली. आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत प्रशिक्षणाचा आराखडा राजेंद्र लोखंडे यांनी तयार करुन या विभागाचे कर्मचारी सुनंदा पाटील, सुरेखा पाटील आणि भरतकुमार फुणगे यांच्यामार्फत प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. ही प्रशिक्षण शिबिरे यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर व प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांनी दिली.

दक्ष राहा, सुरक्षित राहा-

सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाची आवश्यकता, आपत्ती म्हणजे काय, धोक्यांची ओळख, धोके म्हणजे काय, जोखिम कशी ओळखावी, जोखिम म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, विविध प्रकारच्या आपत्तीमध्ये, अगोदर, नंतर काय करावे व काय करू नये, आपत्कालीन व्यवस्थापन चक्र (सज्जता, उपशमन, प्रतिरोध तसेच प्रतिसाद) महानगरपालिकेतील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कार्य, याबबत चर्चा करून त्याबाबतीत सज्जता, उपशमन, प्रतिबंध कसे करावे व घटना घडलीच तर प्रतिसाद कसा द्यावा? प्रथमोपचार म्हणजे काय, प्रथमोपचाराची मार्गदर्शक तत्वे, जखमांचे प्रकार, लक्षणे आणि उपचार, ट्रॉमा व्यवस्थापन तसेच सी.पी.आर. म्हणजे काय? तो कधी व केव्हा द्यावा, इत्यादी बाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.