दिल्ली पोलिसांना बुधवारी दोन पीसीआर फोन आले, ज्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ठार करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी फोन करणाऱ्याचा शोध घेतला असता दिल्लीच्या मादीपूर येथील सुधीर शर्मा याने हा फोन केल्याची माहिती पुढे आली. पोलिसांची टीम आरोपीचा शोध घेत आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला दारु पिण्याची सवय असल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिसांना आलेल्या फोनवेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत असावा, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. आरोपीच्या आवाजावरुन पोलिसांनी हा अंदाज लावला आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपीच्या घरापर्यंत पोहोचत कुटुंबियांची चौकशी केली असता त्याला दारु पिण्याची सवय असल्याचे त्याच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा सर्वसमावेशक तपास पोलिसांनी सुरू केला असून संबंधित व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.
(हेही वाचा – Nanded : नांदेडमध्ये गोरक्षक कार्यकर्त्यांवर कसायांनी केला सशस्त्र हल्ला; एकाचा मृत्यू, ६ जखमी)
दिल्ली पोलिसांना असा धमकीचा फोन येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात, एका व्यक्तीला असाच बनावट फोन केल्याबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकीचा इशारा दिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. हेमंत कुमार असे फोन करणाऱ्याचे नाव असून तो करोलबागमधील रायगर पुराचा रहिवासी होता. गेल्या महिन्यात हेमंत कुमार या निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीचा दिल्ली पोलिसांनी तातडीने तपास लावला आणि त्याला पोलीस ठाण्यात आणून त्यांची संयुक्त चौकशी करण्यात आली, असे नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रणव तायल यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community