पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २० ते २४ जून या कालावधीत अमेरिकेत आहेत. या दौऱ्यात अमेरिकेच्या संसदेतही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहेत. अमेरिकेच्या संसदेत दोनदा भाषणाची संधी मिळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. २२ जून रोजी अमेरिकेत मोदींसाठी सरकारी स्नेह भोजनही आयोजित करण्यात आलं आहे.
व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिमाखात स्वागत केले. यावेळी मोदी यांनी फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना खास गिफ्ट देत भारतातील महाराष्ट्रासहित १० राज्यांतील महत्त्वाच्या वस्तू देखील भेट दिल्या. यामध्ये महाराष्ट्राचा गूळ, पंजाबचे तूप, उत्तराखंडचे तांदूळ आणि हिरा, तामिळनाडूचे तीळ, म्हैसूरमधील चंदनाचा तुकडा, पश्चिम बंगालच्या कुशल कारागिरांनी तयार केलेले चांदीचे नारळ, गुजरातचे मीठ, राजस्थानमधील हाताने बनवलेलं २४ कॅरेट हॉलमार्कचं सोन्याचं नाणं, ९९.५ टक्के कॅरेट चांदीचे नाणे अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. या भेटवस्तूंमध्ये पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा हिरवा हिरा भेट दिला. हा हिरा पृथ्वीवरील ऑप्टिकल आणि रासायनिक गुण दर्शवतो. हा हिरा पर्यावरण अनुकूलही आहे. कारण या हिऱ्याच्या निर्मितीसाठी पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे.
I thank @POTUS @JoeBiden and @FLOTUS @DrBiden for hosting me at the White House today. We had a great conversation on several subjects. pic.twitter.com/AUahgV6ebM
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2023
(हेही वाचा – आदिपुरुष सिनेमावर बंदी आणा; शिंदे गटाच्या खासदाराने केली केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून मागणी)
या भेटी दरम्यान बायडेन दाम्पत्याने पंतप्रधान मोदींना २० व्या शतकातील हाताने बनवलेली प्राचीन अमेरिकन बुक गॅलरी भेट दिली. यासोबतच विंटेज अमेरिकन कॅमेरा, अमेरिकन वाइल्डलाइफ फोटोग्राफीचे हार्डकव्हर पुस्तक देण्यात आले. तसेच फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्यातर्फे रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या संग्रहित कवितांच्या पहिल्या आवृत्तीचे पुस्तक पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community