पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात बुधवारी २१ जून रोजी वीज कोसळून ७ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये ९ जनावरे देखील दगावली आहेत.
जूना मालदा परिसर आणि कालियाचक परिसरात ही वीज कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये ७ जणांसह तब्बल ९ जनावरे देखील दगावली आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतांसह जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच वीज कोसळल्याने ७ जणांना प्राण गमवावा लागला आहे.
(हेही वाचा – पंतप्रधान मोदी यांनी बायडेन दाम्पत्याला दिल्या ‘या’ भारतीय वस्तू)
मिळालेल्या माहितीनुसार, जूना मालदा परिसर, बांगीटोला आणि कालियाचक येथे बुधवारी २१ जून रोजी संध्याकाळी अचानक वीज कोसळली. त्यावेळी १२ जण गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला होता. कृष्ण चौधरी, उम्मे कुलसुम, देबोश्री मंडल, सोमित मंडल, नजरूल एसके, रोबिजोन बीबी आणि एसा सरकार अशी मृतकांची नावे असून मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. जखमी झालेल्यांना आणि मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक सर्व मदत केली जाणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेची माहिती घेतली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली जाणार असल्याचंही मालदाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community