Face Pack : रुक्षपणामुळे तुमच्या चेहऱ्याची गेली आहे चमक? तर वापरा हे ५ नैसर्गिक फेस पॅक

318
Face Pack : तुमच्याही चेहऱ्याची रुक्षपणामुळे गेली आहे चमक? तर वापरा हे ५ नैसर्गिक फेस पॅक
Face Pack : तुमच्याही चेहऱ्याची रुक्षपणामुळे गेली आहे चमक? तर वापरा हे ५ नैसर्गिक फेस पॅक

बहुतेक जण आपल्या रुक्ष त्वचेमुळे काळजीत असतात. या समस्येपासून सुटका हवी असल्यास भरपूर पाणी प्या. तसेच, तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दिनचर्येमध्ये अशा उत्पादनांचा समावेश करा, जे जास्त हायड्रेटिंग आहेत. या ऐवजी रुक्ष त्वचेच्या समस्येसाठी घरच्या घरी बनवलेल्या फेस पॅकचा वापरही करु शकता. हे नैसर्गिक फेस पॅक तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ करण्याचे काम करतील. अनेकविध नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही हा फेस पॅक बनवू शकता.

रुक्ष त्वचेपासून सुटका देतील हे फेस पॅक

या नैसर्गिक फेस पॅकमध्ये ओट्स, मध, दही, बेसन, पपई आणि संत्रे या रसांचा समावेश आहे. हे साहित्य वापरून तुम्ही फेस पॅक घरी कसे बनवू शकता ते सविस्तरपणे जाणून घेऊयात. आपण फेस पॅक झोपण्यापूर्वी किंवा दिवसा कोणत्याही वेळी वापरू शकता.

१. बेसन आणि दह्याच्या मिश्रणाचा फेस पॅक

एका वाटीत दोन चमचे चण्याचे पीठ म्हणचेच बेसन आणि एक मोठा चमचा भरून दही घ्या. या दोन साहित्यांना व्यवस्थित एकजीव करा. या एकत्रित मिश्रणाला तुमच्या पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला व्यवस्थित लावा. त्याला पूर्णपणे सुकू द्या. यानंतर त्वचेला हळूवार मसाज करत फेस पॅक साफ करा. साफ केल्यानंतर चेहऱ्याला कोमट गरम पाण्याने धुवा.

(हेही वाचा – ठाकरे गटाच्या फारुख शेखच्या कार्यालयावर महापालिकेचा हातोडा)

२. ओट्स आणि मधाचा फेस पॅक

एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक मोठा चमचा ओट्स घ्या आणि त्यात अर्धा मोठा चमचा भरून मध मिसळा. या दोन्ही साहित्यांना व्यवस्थित एकजीव करा. या एकत्रित मिश्रणाला तुमच्या पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला व्यवस्थित लावा. सुमारे २० मिनिटे ठेवा. २० मिनिटे झाल्यावर या फेस पॅकला साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनवेळा ह्या फेस पॅकचा वापर करा.

३. पपईचा फेस पॅक

पपई कापा आणि त्याच्या दोन फोडी एका वाटीत घ्या. पपईच्या फोडींना चांगले बारीक वाटून घ्या. बारीक वाटलेल्या मिश्रणात एक चमचा मध मिसळा. या पपईचे मिश्रण तुमच्या पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला व्यवस्थित लावा. २० मिनिटे त्वचेवर राहू द्या. २० मिनिटांनंतर ते स्वच्छ करा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.