Prime Minister Narendra Modi : व्हाईट हाऊसच्या स्वागताने पंतप्रधान नरेंद्र मोदी भारावले

179
Prime Minister Narendra Modi : व्हाईट हाऊसच्या स्वागताने पंतप्रधान नरेंद्र मोदी भारावले
Prime Minister Narendra Modi : व्हाईट हाऊसच्या स्वागताने पंतप्रधान नरेंद्र मोदी भारावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवस अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसला भेट दिली. यावेळी केलेल्या भाषणातून नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी ३ दशकांपूर्वीची एक जुनी आठवण सांगितली आहे.

नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊस येथे केलेल्या भाषणात म्हणाले, “आज व्हाईट हाऊसमध्ये शानदार स्वागत झाले. हा १४० देशवासीयांचा सन्मान आणि गौरव आहे. हा सन्मान अमेरिकेत राहणाऱ्या चार लाखाहून अधिक भारतीय वंशाच्या नागरिकांचा आहे. या सन्मानासाठी जो बायडेन यांचे मी मनपूर्वक आभार मानतो.”

(हेही वाचा – Shivdi : शिवडी येथील क्षय रुग्णालयातील रुग्णांना अखेर मिळणार मांसाहारी जेवण)

दरम्यान, ३० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “तीन दशकांपूर्वी एक सामान्य नागरिक म्हणून मी अमेरिका दौऱ्यावर आलो होतो. तेव्हा मी व्हाईट हाऊसला बाहेरून बघितले होते. पंतप्रधान बनल्यानंतर मी स्वत: इथे अनेकदा आलो आहे. पण एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन समुदायासाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे आज पहिल्यांदा उघडले आहेत. अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे नागरिक आपलं कौशल्य, कर्म आणि निष्ठेने भारताची प्रतिष्ठा वाढवत आहेत. तुम्ही सर्वजण भारत-अमेरिकेच्या संबंधातील खरी ताकद आहात. आज तुम्हाला दिलेल्या सन्मानासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना हृदयापासून धन्यवाद देतो.” “दोन्ही देशातील समाज आणि व्यवस्था लोकशाही मूल्यांवर अधारित आहे. दोन्ही देशांच्या संविधानातील पहिले तीन शब्द ‘we the people’ असे आहेत. अमेरिका आणि भारत हे दोन्ही देशांना आपल्या विविधतेचा अभिमान आहे,” असेही नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.