पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २० ते २४ जून या कालावधीत अमेरिकेत आहेत. या दौऱ्यात अमेरिकेच्या संसदेतही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. अमेरिकेच्या संसदेत दोनदा भाषणाची संधी मिळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर अमेरिकन संसदेतील आपल्या भाषणात मोदींनी नाव न घेता चीनला ठणकावलं. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, असा इशारा मोदींनी यावेळी दिला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भारताच्या अनेक गुणांचा देखील उल्लेख केला. आमच्याकडे २२ अधिकृत भाषा आहेत, प्रत्येत १०० किमीवर पदार्थ बदलतात, संस्कृती बदलते. मात्र या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे, आम्ही ही विविधता साजरी करतो, असं मोदी म्हणाले. मोदींच्या भाषणाला अमेरिकेच्या खासदारांनी भरघोस प्रतिसाद दिला.
Honoured to address the US Congress. Gratitude to all the members of Congress who attended today. Your presence signifies the strength of India-USA ties and our shared commitment to a better future. I look forward to continued partnership in fostering global peace and progress. pic.twitter.com/7VSVT3Hr05
— Narendra Modi (@narendramodi) June 23, 2023
(हेही वाचा – आसाम : पुरामुळे ३१ पैकी २० जिल्हे पाण्याखाली; हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी)
भारत सर्वात मोठी लोकशाही असणारा देश
भारत हा लोकशाहीचा जनक, अमेरिका सर्वात जुनी लोकशाही तर भारत सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. जर ह्यूमन व्हॅल्यूज आणि ह्यूमन राईट नसेल तर लोकशाही नाही. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत सर्वांच्या पाठिंब्याने, सर्वांच्या विश्वासाने चालतो. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. अमेरिकन संसदेला दोनदा संबोधित करणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत, याआधी ऑगस्ट २०१६ मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकन संसदेला संबोधित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर अमेरिकन संसद वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणांनी दणाणली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community