टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या अब्जाधीशांचा मृत्यू

टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचून पुन्हा परत समुद्राबाहेर येण्साठी साधारण आठ तासांचा कालावधी लागतो.

244
टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या अब्जाधीशांचा दुर्दैवी मृत्यू

रविवार १८ जून रोजी टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा भयंकर स्फोट झाला. यामध्ये जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नौदलाला बेपत्ता टायटन पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांना टायटॅनिक जहाजाजवळ टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडले आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडीचा काही दिवसांपूर्वीच स्फोट झाला असल्याचं आढळून आलं आहे. या पाणबुडीच्या स्फोटात पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

बेपत्ता पाणबुडीत कोण होते?

बेपत्ता झालेल्या पाणबुडीत ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामिश हार्डिंग (वय ५८) यांच्यासह पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद (वय ४८) आणि त्यांचा मुलगा सुलेमान (वय १९) हे देखील होते. या तीन पर्यटकांशिवाय एक पायलट आणि एक कंटेंट एक्सपर्ट असे एकूण पाच लोक असलेल्या पाणबुडीनं न्यूफाऊंडलँडच्या सेंट जॉन्स इथून पाण्यात डुबकी लावली.

(हेही वाचा – ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना ईडीचे समन्स; २६ जूनरोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश)

टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचून पुन्हा परत समुद्राबाहेर येण्साठी साधारण आठ तासांचा कालावधी लागतो. पण टायटन पाणबुडी यामध्ये अपयशी ठरली. ओशनगेट एक्स्पिडिशन्सने नुकतेच जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, “आमचे सीईओ स्टॉकटन रश, शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि पॉल-हेन्री नार्गोलेट यांना दुर्दैवाने आपण गमावले आहे यावर आपल्याला विश्‍वास ठेवावा लागणार आहे. ”

ओशनगेटने या निवेदनात म्हटले आहे की, या दु:खद काळात या पाच आत्म्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत आम्ही पूर्ण अंतःकरणाने सहभागी आहोत. ज्यांनी त्यांच्या आप्त स्वकीयांचा जीव गमावला त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.