मिशन २०२४ : ४५० जागांवर विरोधकांचा ‘वन इज टू वन’ फॉर्म्युला

विरोधकांच्या वज्रमुठी समोर भाजपचे मोठे आव्हान

240
मिशन २०२४ : ४५० जागांवर विरोधकांचा 'वन इज टू वन' फॉर्म्युला

वंदना बर्वे

पाटण्यात आज (शुक्रवार २३ जून) राजकीय दृष्टीने मोठी घटना घडत आहे. २०२४ च्या निवडणूकी मध्ये भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी सबंध देशातील विरोधक एकवटले आहेत. मोदींचा पराभव करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावून विरोधकांनी वज्रमूठ तयार केली आहे. तरीसुद्धा विरोधकांची एकता फार दिवस टिकू शकणार नाही, एवढं नक्की. कारण काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सोडला तर इतर पक्षाचा देशभरात फारसा प्रभाव दिसून येत नाही.

यामुळे मोदींचा २०२४ मध्ये पराभव करने विरोधकासाठी सोपे नसेल एवढं नक्की. भाजपविरोधी विरोधी पक्षांच्या बैठकीत राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल,अखिलेश यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच अनेक विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. अजेंडा एकच आहे – २०२४ च्या निवडणुकीत भाजपला एकजूट होऊन पराभूत करणे.

४५० जागांवर विरोधक ‘वन इज टू वन’ फॉर्म्युला घेऊन भाजपला आव्हान देणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच भाजप उमेदवाराच्या विरोधात विरोधकांकडून एकच उमेदवार उभा केला जाणार आहे. मात्र, या फॉर्म्युल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे ते जागावाटपाचे, म्हणजे कोणत्या पक्षाचा उमेदवार किती जागा लढवणार यावर.राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातसह देशभरात लोकसभेच्या सुमारे २०० जागांवर काँग्रेस मजबूत असल्याचा ममता यांचा विश्वास आहे. लोकसभेच्या या २०० जागांपैकी ९१ फक्त राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये आहेत.
विरोधी ऐक्यासाठी ममतांचा फॉर्म्युला लागू केला तर काँग्रेसला २२७ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. या अशा जागा आहेत ज्यांवर २०१९ मध्ये काँग्रेस एकतर जिंकली किंवा भाजपच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर आली.

(हेही वाचा – “विरोधकांची वज्रमूठ सैल करण्याचं काम १४० कोटी जनता करेल”; विरोधकांच्या बैठकीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका)

याशिवाय ३४ जागा अशा आहेत जिथे काँग्रेस प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातील काही जागा काँग्रेसला देण्यास ममता तयार असू शकतात, असे मानले जात आहे.

यामुळे अनेक राज्यातुन काँग्रेसला माघार घ्यावी लागणार आहे. यात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा समावेश आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसने सांगितले की, लोकसभा निवडणुकीत युती झाल्यास 350 पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवणार नाही. देशात लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. काँग्रेसने २०१९ मध्ये ४२१ जागा लढवल्या होत्या. अशा स्थितीत ते विरोधी पक्षांसाठी १९३ जागा सोडण्याच्या तयारीत आहेत.

राहुल यांनी अमेरिका दौऱ्यातही विरोधी ऐक्यासाठी काही द्या आणि काही घ्या, असे म्हटले होते. काँग्रेसने नितीश कुमार यांनाही याबाबत माहिती दिली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस जागांबाबत अंतिम निर्णय घेईल, असे मानले जात आहे. येथे काँग्रेसच्या विजय-पराजयाचा परिणाम जागांवरही होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.