पेरु हे असे फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. पेरुचा लाल आणि पांढरा गर खूप चवदार आणि गोड लागतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी पेरुचे सेवन केले जाते. परंतू तुम्हाला माहित आहे का पेरुसोबत पेरुच्या पानांचेही सेवन केले जाते. पेरूच्या फळांची पाने देखील आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
पेरूच्या पानांत आढळतात ‘ही’ पोषक तत्वे :
पेरुच्या पानांत अशा प्रकारची पोषक तत्वे आढळतात जी आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात. पेरुच्या पानांत कॅल्शियम, पोटॅशियम, सल्फर, सोडियम, लोह, बोरॉन, मॅग्नेशियम, मॅंगनीज यांसारखी खनिजे तसेच व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी या पानांचे पौष्टिक मूल्य वाढवतात.
(हेही वाचा – महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरी ईडीची छापेमारी; आढळल्या कोट्यावधींच्या एफडी आणि…)
पेरुची पानांचे करावे असे सेवन
- दातांच्या दुखण्यावर पेरुची पाने औषध म्हणून खूप उपयोगी आहेत. याव्यतिरिक्त जर तुम्ही पेरुची पाने आणि लवंग एकत्र वाटून दुखऱ्या दातावर लावल्यास दाताचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
- पेरूच्या पानांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, जे नसांमधील खराब कोलेस्ट्रॉल आणि पोटातील चरबी कमी करण्यास मदत करते. पेरुच्या पानांचा रस लठ्ठपणावर उपयोगी ठरतो.
- मधुमेहच्या (प्रकार २) रुग्णांनी या पानांच्या रसाचे सेवन नियमित केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत मिळते तसेच आरोग्य देखील उत्तम राहते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community