PM Narendra Modi : लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पुन्हा नंबर वन

384

जगभरातील नेत्यांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा टॉपवर आले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकन फर्मने 22 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 76 टक्के रेटिंगसह शीर्षस्थानी आहेत. सर्वेक्षणातील सर्व नेत्यांमध्ये हा आकडाही सर्वात कमी आहे. मॉर्निंग कन्सल्टने जारी केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि युनायटेड किंगडम, म्हणजेच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तुलनेत खूप मागे आहेत. मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील 22 देशांमध्ये एका आठवड्यातील (7 ते 13 जून) डेटा गोळा केल्यानंतर त्याची सरासरी जारी केली आहे.

त्या त्या देशातील प्रोढांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा डेटा काढला जातो. या यादीत भारताच्या पंतप्रधानांनंतर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अॅलेन बेरसेट दुसऱ्या क्रमांकावर आहेत. PM मोदींना 76 टक्के रेटिंग मिळाले आहे, तर अॅलन बेरसेट यांना 60 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तिसर्‍या क्रमांकावर 59 टक्के पसंतीसह मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आहेत. यानंतर, चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज(54 टक्के), पाचव्या स्थानावर इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी(52 टक्के), सहाव्या स्थानावर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा(51 टक्के), सातव्या स्थानावर स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ (40 टक्के), आठव्या स्थानावर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन(40 टक्के), नवव्या स्थानवार कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (40 टक्के) आणि दहाव्या स्थानावर बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रो(39 टक्के) आहेत. विशेष म्हणजे, जगातील या 22 देशांपैकी केवळ सहा देश असे आहेत, जिथे 50 टक्क्यांहून अधिक लोकांनी त्यांच्या नेत्याला मतदान केले. अमेरिका , यूके आणि फ्रान्ससह 16 देशांच्या नेत्यांना निम्म्याहून कमी लोकांनी पसंती दर्शवली आहे. या यादीत असे चार देश आहेत, ज्यांच्या नेत्याला देशातील एक चतुर्थांश किंवा त्याहून कमी लोकसंख्येकडून मान्यता मिळालेली आहे.

(हेही वाचा Mumbai Police : ‘आप मुझे दो लाख दो, मै बॉम्बब्लास्ट रुकाऊंगा’, मुंबई पोलिसांकडेच मागितली खंडणी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.