पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील महापालिकेच्या कांदिवली पूर्व येथील सार्वजनिक पादचारी पुलाला जोडलेले जुने सरकते जिने आता बदलले जाणार असून हे जुने जिने काढून आता त्या जागी उच्च क्षमतेचे नवीन सरकते जिने बसवले जाणार आहेत.
कांदिवली पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेल्या सार्वजनिक पादचारी पुलाल लोकांच्या मागणीनुसार सरकते जुने काही वर्षांपूर्वी बसवण्यात आले होते. परंतु हे सरकते जुने वारंवार बंद पडत असल्याने तसेच लोकांचा वापर अधिक असल्याने या पुलावरील या जुन्या सरकत्या जिन्या ऐवजी नवीन सरकते जिने बसवण्याची मागणी होत होती. त्यामुळे महापालिकेच्या आर दक्षिण विभागाने केलेल्या सुचनेनुसार अखेर या पुलाला जोडले जाणारे आठ मीटर उंचीचे उच्च क्षमतेचे सरकते जिने बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने हे सरकते जिने बसवले जाणार आहेत. या नव्याने बसवण्यात येणाऱ्या जिन्यांसाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामासाठ कॅलीसटो हायजीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दोन वर्षांच्या देखभालीच्या कंत्राटाचाही सामावेश आहे.
(हेही वाचा Mumbai Police : ‘आप मुझे दो लाख दो, मै बॉम्बब्लास्ट रुकाऊंगा’, मुंबई पोलिसांकडेच मागितली खंडणी )
Join Our WhatsApp Community