संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाने, आज दिल्ली मध्ये रॉयल थाई हवाई दलाचे उप प्रमुख एअर मार्शल पिबून वोरावनप्रीचा यांच्या नेतृत्वाखालील थायलंड शिष्टमंडळासोबत एका माहिती आणि संवाद बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत संरक्षण उद्योगांच्या अत्याधुनिक क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले होते. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवणे, हा त्या मागचा मुख्य हेतू होता.
भारतीय संरक्षण उद्योगांनी त्यांची अत्याधुनिक संरक्षण क्षमता थायलंडच्या शिष्टमंडळासमोर सादर केली. दोन्ही राष्ट्रांमधले द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कार्यक्रमाचा उद्देश परस्पर सामंजस्य वाढवणे, संभाव्य भागीदारीच्या शक्यता आणि प्रादेशिक सुरक्षेत योगदान देणे हे होते.
(हेही वाचा – Sudhir Mungantiwar : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळेच काश्मीर भारतात – सुधीर मुनगंटीवार)
या कार्यक्रमादरम्यान, दोन्ही देशांकडून मजबूत संरक्षण संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि धोरणात्मक भागीदारीसाठी मार्ग शोधण्याची कटीबद्धता व्यक्त करण्यात आली. हे सादरीकरण आणि चर्चा भविष्यात संरक्षण संशोधन आणि विकास, संयुक्त सराव आणि क्षमता-निर्माण उपक्रमांसह परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात भविष्यातल्या सहकार्याचा मार्ग मोकळा करतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community