कोविड टेंडर घोटाळा प्रकरणी ईडीने दोन दिवसांपूर्वी केलेल्या छापेमारीत ईडीच्या हाती एक डायरी मिळाली आहे. या डायरीत प्रत्येकाचा हिशेब मांडण्यात आला असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. ही डायरी छापेमारीच्या दरम्यान एका संशयिताच्या घरून मिळाली असून ती नक्की कुणाकडे मिळाली याबाबत ईडीने माहिती दिली नसली तरीही लवकरच या डायरीचा खुलासा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोविड काळात देण्यात आलेल्या विविध कामाच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने देखील तपास सुरू करून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून अनेक संशयिताच्या घरावर, कार्यालयावर छापेमारी सुरू करण्यात आली आहे. या छापेमारी दरम्यान मुंबई महानगर पालिकेचे अनेक अधिकारी तसेच कंत्राटदार आणि टेंडरला मान्यता देणारे तत्कालीन लोकप्रतिनिधी ईडीच्या रडारवर आलेले आहे.
(हेही वाचा – तरच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाणीकपातीचा निर्णय)
दोन दिवसांपूर्वी ईडीकडून मारण्यात आलेल्या छापेमारीत ईडीच्या अधिकारी यांच्या हाती संबंधित काही महत्वाचे कागदपत्रासह एका संशयिताच्या घरी छाप्यादरम्यान एक डायरी हाती लागली. ईडीच्या सूत्रांनुसार या डायरीत प्रत्येकांचा हिशेब मांडण्यात आला आहे. टेंडर तसेच कामाच्या दरम्यान महानगर पालिकेच्या अधिकारी यांना देण्यात आलेल्या लाचेचा तपशील देखील या डायरीत मांडण्यात आला आहे. या डायरीतील लाचेच्या नोंदीमुळे महानगर पालिकेच्या अधिकारी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ईडीकडून लवकरच या डायरीचा खुलासा करण्यात येणार असून घोटाळेबाज अधिकाऱ्यांची नावं समोर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community