राजधानी दिल्ली, पंजाब आणि हरयाणामध्ये आज म्हणजेच २४ जून शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमाराला भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ इतकी मोजण्यात आली. गेल्या ३० दिवसांत उत्तर भारतात चौथ्यांदा भूकंपाचे झटके बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे भूकंप झाल्यानंतर अनेकांनी घरात जाणे टाळले. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
माहितीनुसार, राजधानी दिल्ली, पंजाब आणि हरयाणा या तीन राज्यात पहाटे ४ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरयाणातील रोहतक असल्याची माहिती आहे. या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. पहाटे लोक साखरझोपेत असताना हा भूकंप झाला, त्यानंतर झोपेतून उठलेल्या लोकांनी मोकळ्या जागेवर धाव घेतली. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
(हेही वाचा – कोव्हिड टेंडर घोटाळा; त्या डायरीत दडलंय काय?)
उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरयाणा या उत्तर भारतातील राज्यांमध्ये गेल्या महिन्याभरात ४ वेळा भूकंप झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दिल्ली ही राष्ट्रीय राजधानी असल्याने देशविदेशातील अनेक नेते, पर्यटक आणि लोक शहरात येत असतात. त्यामुळे राजधानीत भूकंप झाल्याची घटना समोर आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community