गेल्या काही काळापासून डिजिटल गुन्हेगारी म्हणजेच सायबर क्राईमची संख्या प्रचंड वाढली आहे. एकीकडे संपूर्ण देश डिजिटल होत असतांना दुसरीकडे फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. अशातच अजून एक फसवणुकीचा नवा प्रकार बाजारात आला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. ‘व्हॉट्सअँप पिंक’ असं या नवीन फसवणुकीच्या प्रकारचं नाव आहे.
घोटाळेबाज वापरकर्त्यांना एक लिंक पाठवून त्यांना ‘पिंक व्हॉट्सअँप’ डाउनलोड करण्यास सांगितलं जातं. मात्र त्या लिंकवर क्लिक केल्यास वापरकर्त्यांचे बँक खाते रिकामे होऊ शकते. या फसवणूकीबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सल्लागार नेमले आहेत. त्यांच्यामार्फत वापरकर्त्यांनी अँप डाउनलोड करू नका किंवा अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका असे आवाहन करण्यात येत आहे.
(हेही वाचा – विरोधकांच्या जत्रेत घुसून अस्तित्व दाखवण्याचा ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न – केशव उपाध्ये)
मुंबई पोलिसांच्या सल्लागारांनी सांगितल्या नुसार, “व्हॉट्सअँप नवीन गुलाबी रुपात अतिरिक्त वैशिष्ट्यांसह आला असल्याची बातमी ही एक अफवा असून, या बनावट सॉफ्टवेअरद्वारे तुमचा मोबाइल हॅक होऊ शकतो. फसवणूक करणारे अनेक नव्या युक्त्यांचा आणि पद्धतींचा वापर करुन वापरकर्त्यांना सायबर फसवणूकीच्या जाळ्यात अडकवतात. वापरकर्त्यांनी अशा होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहावे. या डिजिटल युगात सुरक्षित राहणे हे वापरकर्त्यांच्या हातात आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community