बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एकाच वेळी भारतीय महिला संघ आणि पुरुष संघ मैदानावर उतरणार आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे क्रिकेट प्रेमींची उत्सुकता वाढली आहे. चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या एका स्पर्धेमुळे बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ही यंदा वर्षाच्या अखेरीस चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केली जाणार आहे. या टी-२० स्पर्धेसाठी बीसीसीआय आपले पुरुष आणि महिला या दोन्ही क्रिकेट संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवणार आहे. ज्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्याच वेळी एकदिवसीय विश्वचषकही भारतात आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे भारताचा पुरुष ब संघ या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला जाणार आहे. तर, बीसीसीआय या स्पर्धेत प्रमुख महिला खेळाडूंसह एक मजबूत संघ पाठवणार आहे.
(हेही वाचा – वीर सावरकर कुटुंबीयांवरील ‘त्रिवेणी’ या नाटकाचा खर्च राज्य शासन उचलणार)
यावेळी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. तसेच ५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. ३० जूनपूर्वी बीसीसीआय आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवणाऱ्या खेळाडूंची यादी पाठवेल.
आशियाई क्रीडा स्पर्धा यावेळी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. तसेच ५ ते २३ ऑक्टोबरदरम्यान विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. बीसीसीआयने २०१० आणि २०१४ मध्ये आशियाई खेळांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये क्रिकेट स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. परंतू, त्यात भारताने आपल्या पुरुष आणि महिला संघाला पाठवले नव्हते. चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकात आता क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community