Mangal Prabhat Lodha : लोकनेते दी. बा. पाटील यांच्या नावे नवी मुंबईत संग्रहालय; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

285
Mangal Prabhat Lodha : लोकनेते दी. बा. पाटील यांच्या नावे नवी मुंबईत संग्रहालय; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
Mangal Prabhat Lodha : लोकनेते दी. बा. पाटील यांच्या नावे नवी मुंबईत संग्रहालय; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

लोकनेते दी. बा. पाटील यांचे कार्य जगासमोर यावे, या उद्देशाने त्यांच्या कामाची माहिती दर्शवणारे संग्रहालय तयार केले जाणार असल्याची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी केली. या संग्रहालयासाठी आवश्यक ते सहकार्य आणि आर्थिक तरतूद सरकारतर्फे करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दी. बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज), पनवेल येथे कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागातर्फे ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते’. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात ९२० युवकांनी उपस्थिती दर्शविली. यापैकी एकूण ३९१ युवकांना नोकरी मिळाली. तसेच येथे एकूण ४५ कंपनी व आस्थापने सहभागी झाले असून एकूण ४००० पेक्षा जास्त रिक्त पदे उपलब्ध होती.

(हेही वाचा – अर्जुन उद्योग समुहाच्या प्रमुखांनी केली कुटुंबासह आत्महत्या)

कौशल्य शिक्षणावर भर द्यावा

पारंपरिक शिक्षणासह तरुणांनी कौशल्य शिक्षणावर भर द्यावा जेणेकरून नोकरी मिळण्यास मदत होते. आपल्या राज्यात येणारे विविध प्रकल्प, बदलते तंत्रज्ञान, या सगळ्याचाच विचार करून तरुणांना कौशलय विकास आणि रोजगाराच्या विविध संधी नेहमीच शासन उपलब्ध करून देत राहील असे मंत्री महोदयांनी या वेळी सांगितले. त्याचबरोबर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यावर स्थानिक तरुणांना तिथे रोजगार मिळेल. त्या नोकरीकरीता आवश्यक कौशल्याचा विकास व्हावा यासाठी सुविधा निर्माण करू असे लोढा यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.