छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे पुर्वी असमतल असल्यामुळे तिथे धुळीमुळे प्रदुषण होत असे व स्थानिक रहिवाश्यांना फुप्फुसांच्या आजारांचा सामना करावा लागत असे. तसेच पावसाळ्यात मैदानातील खाचखळग्यांमध्ये पाणी साचून खेळाडूंना विविध खेळ खेळण्यास अडथळा निर्माण होत हे मैदान समतल करून त्याठिकाणी मातीचा भराव टाकत हिरवळ तयार करण्याच्यादृष्टीकोनातून पर्जन्यजल पुनर्भरण प्रकल्प राबवण्यात आले. परंतु या मैदानातील रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे विहिरींमध्ये पुनर्भरण करण्याचा प्रकल्प राबवूनही पहिल्याच पावसामध्ये मैदानातील परिसरात तलावसदृश्य स्थिती निर्माण झाली. त्यामुळे अशाप्रकारे मैदानातील पाण्याचा निचरा न झाल्यास मुसळधार पावसात मैदानातील या तुंबलेल्या पाण्यामुळे आजुबाजुचे रस्ते जलमय होण्याची भीती वर्तवली जात आहे.
संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील अर्थात शिवाजीपार्कचा परिसर हरित राखण्यासाठी मैदानातील सछिद्र वाहिन्यांचे जाळे टाकले आहे. परिणामी, मैदान परिसरातील नव्याने तयार केलेल्या ३६ विहिरींमधून हिरवळीसाठी तसेच धूळ उडू नये यासाठी पाणी सिंचन केल्यानंतर त्याचा निचरा होऊन ते पुनश्च विहिरींमध्ये येईल. मैदानातील वाहून येणाऱ्या पाण्याद्वारे विहिरींचे पुनर्भरण होईल.
(हेही वाचा – विरोधकांच्या जत्रेत घुसून अस्तित्व दाखवण्याचा ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न – केशव उपाध्ये)
ही सर्व कामे मैदानाची आंतरराष्ट्रीय दर्जानुसार केलेली असतानाही याची योग्यप्रकारे पुढे देखभाल न झाल्याने शनिवारी (२१ जून) पहिल्याच पावसात शिवाजीपार्क मैदानाचा परिसर जलमय झाला. यातील पावसाच्या पाण्याचा निचरा टाकण्यात आलेल्या पर्जन्यजलवाहिनींद्वारे विहिरींमध्ये न झाल्याने हे पाणी मैदानात अडले गेले आणि मैदानात तलाव सदृश्य स्थिती निर्माण झाली. मागील पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे मैदानातील लाल माती पावसाच्या पाण्याबरोबर रस्त्यावर येवून आसपासचे रस्ते जलमय झाले होते. त्याचप्रमाणे पहिल्याच पावसात मैदानातील निचरा न होणाऱ्या पाण्यामुळे याचे संकेत दिले असून अशाचप्रकारे जर मुसळधार पाऊस कोसळल्यास माती मिश्रित लाल पाणी आसपासच्या रस्त्यावर पसरुन आसपासचे रस्त्यांवर पाणी तुंबले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community