गोवंडी शिवाजी नगर बस डेपो जवळ भूमिगत गटाराची साफसफाई सुरू असताना दोन कामगारांचा मॅनहोल्स मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. कंत्राट दाराच्या माध्यमातून ही भूमिगत नाल्याची मॅनहोल्स मध्ये उतरून सफाई सुरू होती. त्यावेळी ही घटना घडली असून रामकृष्ण आणि सुधीर दास असे मृत कामगारांची नावे आहेत.
गोवंडी शिवाजी नगर, नवीन बस डेपोजवळ ९० फुटी रस्त्याला जोडणाऱ्या रस्ता क्रमांक १० वर शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास, येथील भूमिगत गटाराच्या मॅन होलमध्ये दोन पुरुष व्यक्ती पडले असल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांकडून मुंबई अग्निशमन दलाला प्राप्त झाली.
(हेही वाचा – पाटण्यात जाऊन हिंदुत्व वेशीवर टांगले! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाकरे गटावर टीकास्त्र)
महापालिकेच्या पर्जन्य जल विभागाच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या कंत्राटदारांच्या वतीने येथील भूमीगत नाल्याची सफाई सुरू होती. या सफाईचे काम सुरू असताना सफाई करणारे दोन कामगार त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पण तिथे दाखल करण्यापूर्वीच ते मृत्यू पावले होते. तिथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=Fq7J-VrhmHo
Join Our WhatsApp Community