Aurangzeb : ‘जब तक सूरज-चाँद रहेगा, औरंगजेब तेरा नाम रहेगा…’ असदुद्दीन ओवेसींच्या सभेत घोषणाबाजी; पोलीस झाले सक्रीय

मुस्लिम धर्मांधांनी औरंगजेबाला पाठिंबा दिल्याने कोल्हापूरसह अहमदनगरमध्येही तणाव निर्माण झाला होता.

284

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या महाराष्ट्रातील रॅलीत ‘औरंगजेब अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी व्हिडिओची तपासणीही सुरू केली आहे. ओवेसी बुलढाण्यात जनतेला संबोधित करत असताना त्यांच्या समर्थकांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. नुकताच महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावावर ज्या प्रकारे हिंसाचार झाला, त्यानंतर औरंग्याची औसाद पुन्हा एकदा समोर आली आहे. कोल्हापुरात औरंगजेबाच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप स्टेटस पोस्ट केल्यानंतर वाद सुरू झाला होता.

बुलढाण्यात शनिवारी, २४ जून रोजी ‘औरंगजेब अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. ‘जब तक सूरज-चाँद रहेगा, औरंगजेब तेरा नाम रहेगा…’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ त्यांच्याकडे आले आहेत, ज्याचा तपास सुरू आहे. मात्र, अद्याप कोणाच्याही बाजूने तक्रार दाखल झालेली नाही. पोलिस कायदेशीर मतही घेत आहेत.

(हेही वाचा कमरेखालचे वार करून उद्धव ठाकरेंनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या – चित्रा वाघ)

तक्रार आल्यानंतर व कायदेशीर अभिप्राय घेऊन याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे बुलढाणा पोलिसांनी सांगितले आहे. नुकतेच महाराष्ट्रातही अशी पोस्टर्स पाहायला मिळाली, ज्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘बहुजन आघाडी’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत औरंगजेबाचा फोटो दिसत होता.

या घोषणा दिल्या जात असताना असदुद्दीन ओवेसी यांच्या मागे व्यासपीठावर उभे असलेले नेतेही हसत होते. त्याचवेळी ओवेसी लोकांना शांत करण्यासाठी ‘हा रहेगा, रहेगा’ म्हणत होते आणि हाताच्या इशार्‍याने शांत राहण्यास सांगत होते. मुस्लिम धर्मांधांनी औरंगजेबाला पाठिंबा दिल्याने कोल्हापूरसह अहमदनगरमध्येही तणाव निर्माण झाला होता. मोठ्या संख्येने हिंदू कार्यकर्ते रस्त्यावर आले होते. ओवेसी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्धही पाहायला मिळाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.