25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. आणीबाणीला 48 वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मासिकाने इंदिरा गांधींची तुलना जर्मन हुकूमशहा हिटलरशी केली आहे.
पांचजन्य मासिकाने आपल्या नवीन अंकाच्या कव्हर पेजवर हिटलर आणि इंदिरा गांधी यांचा फोटो लावला असून त्याला ‘हिटलर गांधी’ असे नाव दिले आहे. मासिकाने लिहिले आहे – दोन हुकूमशहा, समान शासन. युरोपमध्ये अनेक ठिकाणी हिटलरचे जघन्य गुन्हे नाकारण्यास किंवा विसरण्यास कायदेशीर बंदी आहे. इंदिरा गांधींनी भारतात लादलेल्या आणीबाणीची ही स्थिती आहे, ज्याचा विसर लोकशाहीच्या अस्तित्वासाठी घातक ठरू शकतो.
(हेही वाचा Jawaharalal Nehru: जवाहरलाल नेहरूंमुळे भारताचा फुटबॉल संघ ऑलिम्पिकमध्ये खेळाला होता अनवाणी )
Join Our WhatsApp Community