Pandharpur Wari : दुसरा गोल रिंगण सोहळा पडला पार; वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहिला

285

पालखी सोहळा प्रमुखांनी इशारा करताच रिंगण सुरू झाले. अश्वाच्या धावण्याची गती पाहून वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहत राहिला. रिंगण सोहळा पार पडताच अवघा आसमंत माउलींच्या नामघोषाने दुमदुमला. यावेळी वारकरी मंडळींनी टाळ-मृदंगाचा गजर करीत अक्षरश: आनंद लुटला. हे चित्र होते माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा येथील. मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण अकलूज जवळील खुडूस फाटा (ता. माळशिरस) येथे पार पडले. यावेळी हजारो वारकरी आणि भाविकांनी हा सुखद रिंगण सोहळा डोळ्यांत साठवला आहे.

यावेळी वारकरी मंडळींनी टाळ-मृदंगाचा गजर करीत अक्षरश: आनंद लुटला. स्त्री-पुरुष वारकऱ्यांनी झिम्मा फुगडय़ांचा खेळ मांडला. वारकऱ्यांनी उंचच्या उंच मनोरे उभे करून सर्वाचे लक्ष वेधले. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर वारकऱ्यांनी फेर धरून उड्या मारत, नाचत आपला हा सोहळा अनुभवला आहे.

(हेही वाचा Land Jihad : भाईंदरमध्ये लँड जिहाद; सरकारी जमिनीवर बांधला दर्गा; ‘हिंदू टास्क फोर्स’ने उघडकीस आणले )

माळशिरस येथील मुक्काम आटोपून सकाळी माउलींच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे मार्गक्रमण होत असताना वाटेत खुडूस फाटय़ाजवळ दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला. सकाळी आठ वाजताच पालखीचे रिंगणस्थळावर आगमन झाले होते. संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा झाल्यानंतर मध्यभागी पालखी विराजमान झाली. नंतर पालखी सोहळा प्रमुखांनी इशारा करताच रिंगण सुरू झाले. अश्वाच्या धावण्याची गती पाहून वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला. रिंगण सोहळा पार पडताच अवघा आसमंत माउलींच्या नामघोषाने दुमदुमला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.