भायखळा रेल्वे हॉस्पिटलमधील नर्सेस क्वाॅटर्सच्या इमारतीच्या प्रवेशाच्या येथील भाग रविवार, २५ जून रोजी दुपारी २.०० वाजता कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत प्रत्यक्षदर्शी असलेल्या वसंत शामराव उटीकर यांनी माहिती दिली की, दुर्घटनेपूर्वी येथे इमारतीतील एक व्यक्ती उभी होती, थोडक्यात ती व्यक्ती बचावली. तसेच माझ्या मोटरसायकलवर हा भाग कोसळल्याने माझ्या दुचाकीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया वसंत शामराव उटीकर यांनी दिली.
ही ६ मजली इमारत असून ती ४५ ते ५० वर्ष जुनी आहे. या इमारतीची अवस्था अतिशय मोडकळीस आलेली असून अतिशय जीर्ण अवस्था झालेली आहे. या इमारतीतील नर्सेस व सर्व कुटुंबिय हे आपला जीव मुठीत घेऊन रोजचे जीवन जगत आहेत. या इमारतीचे दुरुस्तीचे काम अलिकडेच चालू करण्यात आलेले आहे.
(हेही वाचा Jawaharalal Nehru: जवाहरलाल नेहरूंमुळे भारताचा फुटबॉल संघ ऑलिम्पिकमध्ये खेळाला होता अनवाणी )
Join Our WhatsApp Community