Amul Girl : कोण होते सिल्वेस्टर दा कुन्हा? काय आहे अमूल गर्लची कहाणी?

270
‘अटर्ली बटर्ली डिलिशिअस’ अमूल बटरची ही लाईन कोणीही विसरू शकत नाही. या स्वादिष्ट अमूल बटरची नायिका अमूल गर्लला आकार देणारे जाहिरात जगतातील मान्यवर व्यक्तिमत्त्व असलेले गर्सन सिल्वेस्टर दाकून्हा यांचे ९२व्या वर्षी निधन झाले आहे.
कॉलेजमधून विज्ञानाची पदवी घेतल्यानंतर दाकून्हा यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ येथे पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी जाहिरात क्षेत्रात प्रवेश केला. दाकून्हा हे एजीएनआय म्हणजेच ऍक्शन फॉर गुड गव्हरनेन्स अँड नेटवर्किंग इन इंडिया सारख्या सामाजिक कार्याशी जोडलेल्या अनेक संस्थांसोबत काम करायचे. जाहिरात क्षेत्रातील हे एक सर्वोच्च नाव आहे.
ते मुंबई फर्स्ट नावाच्या संस्थेचे गव्हरनिंग बोर्ड सदस्यही होते. मुंबई फर्स्ट नावाच्या संस्थेने म्हटले की, त्यांना दाकुन्हा यांच्या निधनाने खूप दुःख झाले. तसेच पत्रकार राजदीप देसाई यांनीही दाकुन्हा यांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले की, ‘ दाकुन्हा यांनी १९९२-९३ साली घडलेल्या दंगलीमध्ये मुंबईकरांना पुष्कळ सहाय्य केले होते. दाकुन्हा यांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या जाहिरात क्षेत्रातील कार्यकाळात लिंटासचे नेतृत्व केले. त्यानंतर ते सामाजिक क्षेत्रात काम करू लागले. वैश्विक स्तरावर दाकुन्हा यांनी युनिसेफसोबतही काम केले होते. त्यांच्या चांगल्या कामासाठी त्यांना ब्राझील सरकारने त्यांना लॅटिन अमेरिकेन देशात ‘ऑर्डर ऑफ रिओ ब्रॅंको’ ने सन्मानित केले होते.
जाहिरात क्षेत्रातील त्यांचे आठवणीत राहिलेले अमूल्य योगदान म्हणजे आपली सर्वांची लाडकी ‘अमूल गर्ल’. दाकुन्हा यांची पत्नी निशा दाकुन्हा यांनी अमूल गर्लसाठी जिंगल कोड दिला होता आणि तिचे स्केच आर्ट डायरेक्टर युस्टेस फर्नांडिस यांनी तयार केले होते. या ऍडच्या जिंगलसाठी शाम बेनेगल यांची मुलगी पिया बेनेगल यांनी आपला आवाज दिला होता. अमूल गर्ल ऍड कॅम्पेन हे जगातले सर्वात मोठे कॅम्पेन आहे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही नोंदवले गेले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.