पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात दोन महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सेमी कंडक्टर क्षेत्रातील बलाढ्य कंपनी मायक्राँनने आपला प्रकल्प गुजरातमध्ये येणार असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात झालेल्या एका कराराने याची चर्चा सुरु झाली आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रातली बलाढ्य कंपनी मायक्रॉन ही गुजरातमध्ये 22 हजार 540 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 5 हजार थेट रोजगार आणि पुढच्या काही वर्षांत 15 हजार अप्रत्यक्ष रोजगार त्यातून उपलब्ध होतील, असा दावा केला जात आहे. वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ सेमीकंडक्टर निर्मितीतला हा महत्वाचा प्रकल्प गुजरातमध्ये असेल.
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे निमित्त साधूनच ही मोठी घोषणा मायक्रॉन कंपनीने केली आहे. सेमीकंडक्टर निर्मितीत भारताला सक्षम बनवण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल असेल, असे केंद्राच्या वतीने सांगितले जात आहे. पण मायक्रॉन ही अमेरिकन कंपनी सेमीकंडक्टर भारतात बनवणार नाही, तर इथे जुळणी, चाचणी आणि पॅकेजिंग युनिट स्थापन करणार आहे. चीन आणि तैवान हे दोन देश सेमीकंडक्टर उत्पादनात आघाडीवर आहेत. सेमीकंडक्टर उत्पादनात चीनचा वाटा 38 टक्के तर तैवानचा 27 टक्के इतका आहे. ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठीच वेगवेगळ्या पद्धतीनं सेमीकंडक्टरचे उत्पादन भारतात वाढवण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच उत्पादन नसले तरी किमान पॅकेजिंग, असेम्बलिंगने तरी मायक्रॉननं आपले भारतात अस्तित्व दाखवावे यासाठी ही करार महत्वाचा आहे. पण यात कंपनीचा प्रत्यक्ष वाटा कमी आणि केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार 20 टक्के वाटा उचलणार असल्याने प्रत्यक्षात करदात्यांचाच पैसा लागणार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. मोदींच्या अमेरिका दौऱ्यात गुजरातला आणखी एक मोठे गिफ्ट मिळाले आहे. गुगलसारखी बलाढ्य कंपनी आपले ग्लोबल फिनटेक सेंटरही गुजरातला उभारणार असल्याची घोषणा सीईओ सुंदर पिचाई यांनी केली आहे.
(हेही वाचा Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी हिंदूंचे घोषणापत्र जाहीर; काय आहेत मुद्दे?)
Join Our WhatsApp Community