आषाढीला पंढरपुरला जाऊन पांडुरंगाचे दर्शंन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी आतुर असतो. केव्हा एकदा विठुरायाचे दर्शंन घेतो आणि डोळेभरुन बघतो, अशी भावना प्रत्येक वारकऱ्याची असते. याच भावनेतून दिल्लीतील मराठी भाषिकांनी आषाढी सोहळयानिमीत्त वारीचे आयोजन केले आहे.
दिल्लीकर मराठी भाषिकांनी दिल्लीतच आषाढी एकादशीनिमीत्त सांकेतिक वारी सोहळा आयोजित करण्याची परंपरा सुरु केली आहे. या गुरुवारी म्हणजेच २९ जून रोजी दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने पहाटे सहा ते सकाळी दहा या वेळेत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
(हेही वाचा – संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता)
दिल्लीतील हनुमान मंदीर कॅनॉट प्लेस पासून सुरु झालेली वारी आरकेपुरम येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीरात समारोप होइल. साधारण १५ किलोमीटरचे अंतर असून वाटेवर असलेल्या विविध देशांच्या दुतावासाच्या मार्गांतून ही वारी प्रस्थान करेल. नाचत, गात विठुनामाचा गजर करीत गुडगाव, दिल्ली ,नोएडा येथील मराठी नागरिक मोठया संख्येने वारीत सहभागी होतील.
दिल्ली मराठी प्रतिष्ठान अनेक मराठी सोहळे दरवर्षीं असेच उत्साहात साजरे करतात. यावेळी मराठी नागरिकांचा उत्साह देखील वाखाण्ण्याजोगा असतो, हे महत्वाचे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community