Furniture : लाकडी फर्निचरवर पडलेले ओरखडे ‘या’ फळाचा वापर केल्याने होतील गायब

181

काहीजण आपल्या घरात महागातले लाकडी फर्निचर वापरतात. या लाकडी फर्निचरवर ओरखडे आल्यास ते खराब आणि जुने दिसते. जर तुमच्याही लाकडी फर्निचरवर ओरखडे पडले असतील तर एक सोपा उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. काय आहे तो उपाय चला जाणून घेऊया…

अक्रोडाचा एक छोटा तुकडा फर्निचरवरचे ओरखडे करेल ठीक

अक्रोड हा लाकडी फर्निचरवर पडलेल्या ओरखड्यांवरचा सर्वात चांगला पर्याय आहे. अक्रोडाच्या मदतीने छोट्या ओरखड्यांना आरामात घालवू शकतो. यासाठी तुम्हाला अक्रोडाचा एक छोटा तुकडा आणि सुक्या मऊ कपड्याची गरज लागेल. जर ओरखडा मोठा आणि खोल असेल तर हा उपाय कामी येणार नाही.

(हेही वाचा मुंबई पोलिसांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ अंतर्गत २०० वॉन्टेड पोलिसांच्या जाळ्यात)

असे काढा लाकडी फर्निचरवरचे ओरखडे

लाकडी फर्निचरवरचे ओरखडे घालवण्यासाठी सर्वात आधी अक्रोडचा एक छोटा तुकडा घेऊन ओरखडा पडलेल्या भागावर हलक्या हाताने घासा. काही वेळ असे केल्याने फर्निचरवर पडलेले ओरखडे नाहीसे होतील. अक्रोडाचे तेल फर्निचरवरचे ओरखडे ठीक करण्यास मदत करेल. यानंतर, कोरड्या आणि मऊ कापडाने तो भाग पुसा. यानंतरही ओरखडे दिसत असल्यास, वरील क्रिया पुन्हा एकदा करा, ओरखडे नाहीसे होतील.

लहान ओरखड्यांवर कामी येईल हा उपाय

अक्रोडाच्या मदतीने फर्निचरचे ओरखडे काढताना, हे लक्षात ठेवा की फक्त लहान ओरखडे काढण्यासाठी हा उपाय योग्य आहे. जर फर्निचरवर खूप मोठा आणि खोल ओरखडा असेल तर तो या उपायाच्या मदतीने काढता येणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.