पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेत सुरू असलेल्या दौऱ्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी अमेरिकेतील अनेक व्यावसायिकांच्या भेटी घेतल्या. ते तिथल्या राष्ट्रपतींनाही भेटले. वाॅशिंग्टन डी सी येथे पोहोचल्यावर तिथे त्यांचे भव्य स्वागत केले गेले. अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांना भेटवस्तू दिल्या.
यादरम्यान ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसला. या व्हिडिओमध्ये एक पगडी घातलेला इसम भारताचा झेंडा तिरंगा पायदळी तुडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच त्याच वेळी एक भारतीय पत्रकार त्याला अडवताना दिसतो आहे. तो म्हणतो की, ‘तिरंग्याचा अपमान करू नकोस.’
या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांच्या संतापलेल्या प्रतिक्रिया येत आहेत. एका जणाने म्हटले की, ‘या असल्या लोकांसाठी भारताचा नागरिकच त्यांना वठणीवर आणण्यासाठी पुरेसा आहे.’ तर आणखी एक जण म्हणाला की, ‘अशा लोकांसाठी भारताचे नागरीकत्व लगेच रद्द करायला हवे. जर बाहेरचे लोक असतील तर त्यांना भारतात प्रवेशबंदी करायला हवी.’
पाहा हा धक्कादायक व्हिडिओ:
तिरंगे का अपमान करने वाले खलिस्तानी से भिड़े वीर पत्रकार @vikasbha भाई pic.twitter.com/7hunF7uMjP
— Tejinder Pall Singh Bagga (@TajinderBagga) June 22, 2023
हा व्हायरल झालेला व्हिडीओ UN हेडक्वार्टरच्या बाहेरचा आहे असं म्हटलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्यासाठी काही खलिस्तानी लोक अमेरिकेत पोहोचले होते असंही म्हटलं जातंय. त्यांच्यातल्याच एक माणूस तिरंगा आपल्या पायाखाली तुडवत होता त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या भारतीय पत्रकार विकास भदोरीया यांनी त्यांना थांबवण्याचा आणि तिरंगा वाचवण्याचा प्रयत्न केला असं या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते.
Join Our WhatsApp Community